पथारी व्यावसायिकांवर अन्याय होणार नाही : हेमंत रासने

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील पथारी व्यावसायिकांवर कोणताही अन्याय होणार नाही असे आश्वासन महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी पथारी व्यावसायिक संघटनेला दिले.

पथारी व्यावसायिकांच्या भाडेदरात झालेली वाढ कमी करावी अशा मागणीसाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे उपोषण महापालिकेच्या प्रवेशदारी चालू होते. संघटनेच्या मागणीबाबत उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृहनेते धीरज घाटे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, नगरसेवक डॉ. सिद्धार्थ धेंडे, अतिरिक्त आयुक्त रुबल आगरवाल, माधव जगताप, दिनेश धाडवे यांनी संघटनेचे डॉ. आढाव, बाळासाहेब मोरे यांच्याशी चर्चा केली. पथारी व्यावसायिकांवर अन्याय होणार नाही असे आश्वासन रासने यांनी दिले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/