Pune Municipal Corporation | 23 गांवे बकाल होऊ देणार नाही; गावांच्या विकासासाठी काँग्रेस मोहीम राबविणार – माजी आमदार मोहन जोशी

पुणे (Pune) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – पुणे महापालिकेत (pune municipal corporation) समाविष्ट झालेल्या २३ गावांच्या विकासाकडे काँग्रेस पक्षाचे लक्ष असून लवकरच पक्षाकडून मोहीम हाती घेतली जाईल, ही गावे बकाल होऊ देणार नाही, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष आणि माजी आमदार मोहन जोशी (Former MLA Mohan Joshi) यांनी जाहीर केले आहे. काही दिवसांपुर्वीच राज्य सरकारनं पुणे शहरालगतची 23 गांवे पुणे महापालिकेत (pune municipal corporation) समाविष्ट केल्याची अधिसूचना काढली होती.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pimpri-Chinchwad Crime Branch Police | गर्लफ्रेंडला पळवलं एकानं अन् खून केला दुसऱ्याचा, दोन वर्षानंतर झाला खुनाचा उलगडा

मोठ्या शहरांच्या नियोजनबद्ध विकासासाठी काँग्रेस पक्ष सातत्याने आग्रही राहिला आहे.केंद्रामध्ये मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारने (Manmohan Singh Government) जवाहरलाल नेहरु नागरी पुनर्निर्माण योजना (Jawaharlal Nehru Urban Reconstruction Plan) ठोसपणे राबविली होती. सांडपाणी निचरा प्रकल्प, प्रशस्त रस्ते, नदी सुधारणा अशा मूलभूत विकास कामांसाठी हजारो कोटींचा निधी काँग्रेस सरकारने (Congress Government) उपलब्ध करून दिला होता. राज्यात काँग्रेस आघाडी सरकार (Congress-led government) असताना मेट्रो (Metro) या महत्त्वाकांक्षी योजनेचा पाया रचला गेला.

हरित पुणे (Pune) ही संकल्पना काँग्रेस पक्षाने (Congress Party) मांडली आणि शहरातील टेकड्यांचे जतन केले.काँग्रेस पक्षाचे शहर विकासाचे धोरण राबवून पुणे महापालिकेत (pune municipal corporation) समाविष्ट झालेल्या 23 गावांकडे लक्ष ठेवून तेथील समस्या सोडविणे, विकास कामांसाठी राज्य शासनाकडून निधी उपलब्ध करून देणे याकरिता मोहीम आखून काँग्रेस पक्ष पाठपुरावा करेल, असे मोहन जोशी (Mohan Joshi) यांनी पत्रकात म्हटले आहे.

काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress Leader Nana Patole) , महसूलमंत्री
आणि माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Minister Balasaheb Thorat) , पक्षाचे पुणे
जिल्हा संपर्क मंत्री सुनिल केदार (Minister Sunil Kedar) यांना गावांच्या विकासासाठी
मागण्यांचे निवेदन देऊन त्यांचे दौरे आखले जातील, 23 गांवातील पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या जातील. आगामी निवडणुकीची व्यूहरचना केली जाईल, असे मोहन जोशी (Mohan Joshi) यांनी स्पष्ट केले आहे.

हे देखील वाचा

Chakan News | कनेक्टरच्या सहाय्याने धोकादायकरित्या गॅस चोरी करणारे दोघेजण गजाआड, 34 लाखांचा मुद्देमाल जप्त

MLA Rohit Pawar | राजकारण व समाजकारणासोबतच आ. रोहित पवार जपत आहेत अध्यात्मिक विचारांचा ठेवा


ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Municipal Corporation | 23 The villages will not be left empty; Congress to launch campaign for village development – Former MLA Mohan Joshi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update