pune municipal corporation | पुणे महापालिकेच्या निवडणूक विभाग प्रमुखपदी अजित देशमुख यांची नियुक्ती; निवडणुकीचे पडघम वाजू लागले, ‘घट’ बसला !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पुणे महापालिकेमध्ये (Pune Municipal corporation) आज महत्वपुर्ण घटना घडली. पुणे महापालिकेच्या निवडणूक (Pune Municipal Election) विभागाचा पदभार घनकचरा विभागाचे उपायुक्त अजित देशमुख (Ajit Deshmukh) यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीसाठीच्या मतदार यादी, प्रभाग रचना, आरक्षण सोडतीपासून संपुर्ण प्रक्रिया देशमुख यांच्या माध्यमांतूनच होणार आहे. Pune Municipal corporation | Ajit Deshmukh appointed as Head of Election Department of Pune Municipal Corporation; The drumbeat for the election has begun

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

पुणे महापालिकेच्या सध्याच्या विश्‍वस्तांची मुदत फेब्रुवारी २०२२ मध्ये संपत आहे.
यामुळे आगामी निवडणुकीच्या दृष्टीकोनातून तयारी सुरू करावी लागणार आहे.
कोरोनामुळे औरंगाबाद, नवी मुंबई, वसई विरारसह काही महापालिकांचा कार्यकाळ पुर्ण झाल्यानंतरही निवडणुका होउ शकल्या नाहीत.
वरिल सर्व महाापलिकांच्या निवडणुका सहा महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
सध्या कोरोनाची लाट आटोक्यात आल्याचे चित्र दिसत असले तरी तिसरी लाट येण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.
अशातच ओबीसींच्या राजकिय आरक्षणाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.
हे दोन्ही प्रश्‍न तूर्तास तातडीने सुटतील, अशी शक्यता नसल्याने पुणे, मुंबईसह राज्यातील दहा महापालिकांच्या निवडणुकाही पुढे ढकलल्या जातील, असा तर्क व्यक्त करण्यात येत आहे.
परंतू याबाबत राज्य निवडणूक आयोगाने अद्याप काहीच घोषणा केलेली नाही, त्यामुळे महापालिकेने नेहमीप्रमाणे आठ महिने अगोदरच तयारीला सुरूवात केली आहे.
निवडणूक विभागाच्या प्रमुखपदी अजित देशमुख यांची नियुक्ती हा त्याचाच एक भाग आहे.

महापालिकेच्या निवडणूक विभागाचा कार्यभार मालमत्ता व्यवस्थापन प्रमुख उपायुक्त राजेंद्र मुठे यांच्याकडे होता.
उप जिल्हाधिकारी असलेले मुठे यांचे प्रमोशन झाले आहे.
त्यांची प्रलंबित बदली लवकरच होण्याची शक्यता आहे.
यामुळे सहा महिन्यांपुर्वीच पुणे शहरात बदलीवर आलेले उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांच्याकडे निवडणूक विभागाची धूरा सोपविली असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे.

Web Title : Pune Municipal corporation | Ajit Deshmukh appointed as Head of Election Department of Pune Municipal Corporation; The drumbeat for the election has begun

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

PF News | कोरोना काळात नोकरी गमावणार्‍या कर्मचार्‍यांचे PF चे योगदान मार्च 2022 पर्यंत देणार सरकार