पुणे महापालिकेकडून मॉल व मार्केट कॉम्प्लेक्ससाठीची नियमावली जाहीर, ‘या’ अटींवर 5 ऑगस्टपासून लॉज, गेस्ट हाऊस, अतिथीगृह सुरू होणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर राज्य सरकारकडून 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असला तरी त्यामधील अनेक नियम शिथील करण्यात आले आहेत. दरम्यान, 5 ऑगस्ट पासुन कंटेन्मेंट क्षेत्राबाहेरील (प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील) मॉल आणि मार्केट कॉम्प्लेक्स सुरू करण्यास पुणे महापालिकेनं यापुर्वीच काही अटी व शर्तींवर परवानगी देत असल्याचं जाहीर केलं होते. त्याबाबत मनपा आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, 5 ऑगस्टपासूनच शहरातील कंटेन्मेंट क्षेत्राबाहेरील हॉटेल्स, लॉजेस, अतिथीगृह तसेच निवासी सुविधा पुरविणारे हॉटेल्स सुरू करण्यास महापालिकेने काही अटींवर परवानगी दिली आहे.

कंटेन्मेंट क्षेत्राबाहेरील लॉज, गेस्ट हाऊस, अशी निवासी सुविधा पुरविणारे हॉटेल व्यवसायांकरिता काही अटींच्या आधारे निर्बंध 5 ऑगस्टपासून शिथिल करण्याबाबत सुधारणेचे आदेश देण्यात आले आहेत. निवासी व्यवस्था प्रदान करणारे हॉटेल्स, लॉजेस, अतिथीगृह, इ. व्यवसायांकरिता सोबत काही अटींच्या आधारे निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. हे व्यवसाय त्यांच्या एकूण क्षमतेच्या केवळ 33 टक्के क्षमता जोडलेल्या परिशिष्ट-1 मधील अटींच्या आधारे वापरू शकणार आहेत. दरम्यान, नमूद व्यवसायाच्या ठिकाणी जर मनपाचे क्वारंटाईन केंद्र सुरूअसेल तर त्या कारणाकरिता वापर पुढे सुरू राहणार आहे. त्याप्रमाणे उर्वरित भागापैकी किंवा उर्वरित पूर्ण 67 टक्के भाग मनपा क्वारंटाईन केंद्र म्हणून वापरू शकणार आहे.

कंटेन्मेंट क्षेत्राबाहेरील मॉल आणि मार्केट कॉम्प्लेक्स 5 ऑगस्टपासून सुरू होणार असून त्याची नियमावली देखील आज जाहीर करण्यात आली आहे.