पुणे महापालिकेकडून 7 वा वेतन आयोग लागू करण्यास मान्यता, 18 हजार कर्मचार्‍यांना होणार लाभ; सर्वसाधारण सभेत मंजूरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   पुणे महापालिकेने कर्मचार्‍यांना 7 वा वेतन आयोग लागू करण्यास आज मान्यता दिली आहे. मनपाच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्वांनी एकमताने या ठरावास मंजूरी दिली आहे. अंतिम मान्यतेसाठी ठराव हा राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचं सांगण्यात आले आहे.

सर्वसाधारण सभेत एकुण 41 उपसूचना आल्या होत्या. त्यापैकी 19 विसंगत तर 22 मंजूर करण्यात आल्या आहेत. पुणे मनपाच्या साधारण 18 हजार कर्मचार्‍यांना 7 व्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे. वेतन फरक आणि वेतन वाढ असा एकुण 550 कोटी रूपयांचा बोजा मनपावर पडणार आहे. शिक्षण मंडळात देखील 7 वा वेतन आयोग 2 उपसूचनांसह मंजूर करण्यात आला आहे.