pune municipal corporation | कोंढव्यातील सिविक कल्चरल ऍन्ड कम्युनिटी सेंटरची निविदा रद्द करण्यावर सत्ताधारी ‘तोंडघशी’

विरोधकांच्या टीकेनंतर या सेंटरचे उर्वरीत काम करण्याचे सर्वसाधारण सभेत आश्‍वासन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महापालिकेच्या pune municipal corporation सर्वसाधारण सभेमध्ये सत्ताधारी भाजप (BJP) आज पुन्हा तोंडघशी पडली. विरोधकांच्या जोरदार टीकेनंतर स्थायी समितीने रद्द केलेली कोंढवा (Kondhwa) येथील सिविक कल्चरल ऍन्ड कम्युनिटी सेंटरच्या उर्वरीत कामाची निविदा मंजुर करून काम पुन्हा सुरू करण्याचे आश्‍वासन सभागृह नेते गणेश बिडकर ganesh bidkar यांनी आज सर्वसाधारण सभेमध्ये दिले.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

महापालिकेच्यावतीने pune municipal corporation कोंढवा येथे सिविक कल्चरल ऍन्ड कम्युनिटी सेंटर या बहुद्देशीय हॉलचे काम सुरू आहे. मागील काही वर्षात दीड ते पावणेदोन कोटी रुपये खर्च करून यासाठीच्या इमारतीचे काम करण्यात आले आहे. मागील आर्थिक वर्षात स्थानीक नगरसेवक गफूर पठाण (Corporator Gafoor Pathan) यांनी उर्वरित कामासाठी त्यांच्या निधीतून आर्थिक तरतूद उपलब्ध करून दिली होती. त्यानुसार निविदाही काढून मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे मान्यतेसाठी ठेवण्यात आली होती. मार्च महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात स्थायी समितीने ही निविदा रद्द केली. विशेष असे की यासाठी दिलेला फेरविचाराचा प्रस्तावही रद्द केला. यामुळे गफूर पठाण यांच्यासह स्थानिक नगरसेवकांनी वेळोवेळी आवाज उठविण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, कोरोनामुळे (Corona) दिर्घ कालावधीनंतर झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस (Nationalist Congres), कॉंग्रेस (Congress) आणि शिवसेनेने (Shiv Sena) जोरदार आवाज उठविला. अर्धवट कामावर झालेला खर्च कोणाकडून वसुल करणार, या कामासाठी अंदाजपत्रकात तरतूद व स्वतंत्र बजेट हेड असतानाही प्रशासनाने मान्यतेसाठी ठेवलेली निविदा स्थायी समितीने कशाच्या आधारावर रद्द केली. या वास्तूचा गैरवापर झाल्याचे निदर्शनास आल्यास ती ताब्यात घेण्याचा अधिकारही महापालिकेला आहे. अशावेळी केवळ भेदाभेद करून चालणार नाही. सर्वांना समान न्याय द्यावा लागेल. त्यामुळे सेंटरच्या कामाची निविदा मंजुर करावी आणि निधीही उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, गटनेते आबा बागुल, पृथ्वीराज सुतार, माजी महापौर प्रशांत जगताप, अरविंद शिंदे यांनी सर्वसाधारण सभेमध्ये लावून धरली. मात्र, सत्ताधारी भाजपकडून (BJP) एकाही सदस्याने स्थायी समितीने निविदा रद्द करण्यामागील कारणीमिमांसा करण्याचा साधा प्रयत्नही केला नाही. सभागृहनेते गणेश बिडकर यांनी गैरसमजुतीतून अथवा काही तक्रारींमुळे ही निविदा रद्द करण्यात आली असेल, ती पुन्हा मंजुर करून या सेंटरचे काम करण्यात येईल, असे आश्‍वासन दिल्यानंतर यावर पडदा पडला.

Web Titel :- pune municipal corporation | Authorities reject tender for Civic Cultural and Community Center in Kondhwa

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

हे देखील वाचा

PM Narendra Modi | लोकप्रियतेत पीएम नरेंद्र मोदीच सर्वोत्कृष्ट नेते; जो बायडन यांच्यासह 13 जागतिक नेत्यांना टाकलं मागे

धक्कादायक ! गुजरातच्या साबरमती नदीत सापडला कोविड-19 व्हायरस, तपासणीत सर्व नमुने आढळले संक्रमित