Pune Municipal Corporation। महापालिकेकडून निलेश राणे आणि संजय काकडे यांना नोटीस; थकवली तब्बल 83 लाखांची पाणीपट्टी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महानगरपालिकेकडून (Pune Municipal Corporation) पाणीपट्टी थकविणाऱ्या 856 जणांची यादी महानगरपालिकेच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात आली आहे. तब्बल 200 कोटी रुपयांची पाणीपट्टी थकलेली असल्याचे दिसून आले. त्यामुळे पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation) सर्वाना नोटीस बजावली आहे. मुख्यतःआणि धक्कादायक म्हणजे या जारी करण्यात आलेल्या यादीमध्ये भाजपचे नेते निलेश राणे (Nilesh Rane) आणि भाजपचे माजी खासदार संजय काकडे (Sanjay kakade) यांच्यासह अनेक नामांकित शिक्षणसंस्था सरकारी कार्यालय आणि बिल्डरचा देखील समावेश आहे. यामुळे वसुलीसाठी पुणे महापालिका प्रशासनाकडून कठोर भूमिका घेत नोटीस बजावण्यात आली आहे.

खासगी आणि व्यावसायिक दोन्ही प्रकारच्या पाण्याच्या कनेक्शनच्या थकबाकीने 200 कोटींपर्यंत आकडा गेला आहे. त्यामुळे आता वसुलीसाठी महापालिका (Municipal Corporation) प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. म्हणून जर 25 जूनपर्यंत थकबाकी भरली नाही तर पाणी कनेक्शन कापण्यात येणार असल्याच म्हटलं आहे. तसं नोटीसमध्ये नमूद करण्यात आलं आहे. परंतु, वसुलीसाठी महापालिका प्रशासनावर अनेकदा बड्यांचे दबाव येत असल्याने थकित रक्कमेची वसुली करणे पुणे महानगरपालिकेला शक्य होऊन बसते. या दरम्यान, ही थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेकडून यादी जाहीर केली असली तरी परंतु, प्रत्यक्षात वसुली होणार का? हा खरा प्रश्न आहे.

थकबाकी आणि थकबाकीदार कोण आहेत?

> 1 कोटी पेक्षा जास्त थकबाकीदार : संख्या – 86 आणि थकीत रक्कम – 22 कोटी

> 10 लाख ते 1 कोटी रक्कम : संख्या – 254 आणि थकीत रक्कम – 58 कोटी 81 लाख

> 5 लाख ते 10 लाख रक्कम : संख्या – 1027 आणि थकीत रक्कम – 60 कोटी

> 3 लाख ते 5 लाख रक्कम : संख्या – 1336 आणि थकीत रक्कम – 52 कोटी 15 लाख

थकबाकीदारांमध्ये असलेली मोठी नावे आणि थकबाकी –

– भाजपाचे माजी खासदार निलेश नारायण राणे – सुमारे 17 लाख रुपये

– भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांच्या मालकीच्या कंपन्यांचे थकबाकी – सुमारे 66 लाख रुपये

– पुणे पोलीस आयुक्तालय आणि अन्य इमारती – सुमारे लाख रुपये

– पोलीस महासंचालक CID – लाखो रुपये थकीत

– फर्ग्युसन कॉलेज सारख्या नामांकित शिक्षण संस्थेची – लाखो रुपये

– प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे – लाखो रुपये.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : pune municipal corporation | bjp leader nilesh rane and sanjay kakade exhausted rs 83 lakh water supply notice issued by pune municipal corporation

हे देखील वाचा

Ayodhya Shri Ram Janmabhoomi land scam । राम मंदिरासाठी खरेदी केलेल्या जमीन व्यवहारात घोटाळा ? अजित पवार म्हणाले..

चीन्यांना भारतीयांनी दिले सडेतोड उत्तर; 43 % लोकांनी खरेदी केल्या नाहीत चीनी वस्तू

Pune Crime Branch | जबरी चोरी करणार्‍या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक