Pune : महापालिकेच्या कर्मचार्‍याची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पालिकेच्या गाडीखाना रुग्णालयाच्या विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. आज सकाळी ही घटना उघडकीस आली असून, आत्महत्ये मागचे कारण समजू शकलेले नाही.

विजय तांदळे (वय 52) असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विजय तांदळे हे मंडई येथील गाडीखाना एचआयव्ही विभागात नोकरीस होते. दरम्यान मध्यरात्री त्यांनी येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी इतर कर्मचारी गेल्यानंतर त्यांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आली. यानंतर खडक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आत्महत्या नेमकी का केली हे समजू शकलेले नाही. त्याबाबत पोलीस तपास करत असल्याचे सांगण्यात आले आहे.