pune municipal corporation | भविष्यात कचरा वाहतुकही ‘ई-वाहना’तून ! प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी सुरू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – वाढते प्रदुषण रोखण्यासाठी ई – वाहनांचा E-Vehicles प्रयत्नपुर्वक वापर करण्यासाठी महापालिका (pune municipal corporation) पुढे सरसावली आहे. या वर्षीच्या अंदाजपत्रकामध्ये अधिकार्‍यांसाठी ई- वाहन अर्थात वीजेवर चालणार्‍या मोटार खरेदीसाठी तरतूद करण्यात आली असून आता विजेवर चालणार्‍या मोठ्या वाहनांतुन कचरा वाहतूक करता येईल ? याची चाचपणी महापालिका (pune municipal corporation) प्रशासनाने सुरू केली आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

पीएमपीएमएलच्या PMPML ताफ्यात यापुर्वीच ई – बसेस दाखल झाल्या आहेत. या बसेसमुळे प्रदुषण कमी करण्यास हातभार लागला असताना इंधनावरील खर्चातही कपात झाली आहे. येत्या काही दिवसांत आणखी ५० ई – बसेस पीएमपीच्या ताफ्यात दाखल होत आहेत. अशातच महापालिका आयुक्त विक्रम कुमार Municipal Commissioner Vikram Kumar यांनी २०२१-२२ या वर्षिच्या अंदाजपत्रकामध्ये अधिकार्‍यांसाठी ई- मोटारी खरेदीसाठी आर्थिक तरतूद केली आहे. त्यानुसार येत्या काही महिन्यांत या मोटारी खरेदी करण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत.

यासोबतच महापालिकेकडे कचरा उचलण्यासाठी मोठे ट्रक आहेत. या विभागासाठी ई – ट्रक वापरता येतील? याची चाचपणी महापालिकेने सुरू केली आहे. या ट्रकची कचरा वहन क्षमता, वजन क्षमता तपासणी करण्यात येत असून प्रायोगिक तत्वावर चार ट्रकचा वापर करण्यात येत आहे. यासोबतच महापालिकेने खाजगी संस्थेसोबत ई- बाईक्स भाडेतत्वावर देण्याच्या प्रस्तावाला यापुर्वीच मान्यता दिली असून महापालिका शहरात विविध ठिकाणी या संस्थांना ठिकठिकाणी चार्जिंग स्टेशन्स Charging Stations उभारुन देणार आहे.

महापालिकेचा दरवर्षी इंधनावर २४ कोटी रुपये खर्च होत आहे.
पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे या खर्चामध्ये वाढच होत राहाणार आहे.
महापालिकेकडे आजमितीला १८० मोटार असून ७५० हून अधिक अवजड वाहने आहेत.
यामध्ये प्रामुख्याने कचरा वाहतुकीसाठी सर्वाधीक वाहनांचा वापर होतो.
यावर्षी अधिकार्‍यांच्या वापरासाठी ५० टक्के मोटार खरेदी करण्यात येतील.
तर उर्वरीत ५० टक्के मोटार पुढील वर्षी खरेदी करण्यात येतील.
ई मोटार पुरविणार्‍या कंपन्यांसोबत चर्चा सुरू आहे.
विशेष असे की या मोटारींना जीपीएस सिस्टिम असल्याने मोटारींचा नियोजीत वापर होईल, अपेक्षा आहे.
तसेच कचरा वाहतुकीसाठीही ई ट्रक्सचा वापर करता येतोय का याची चाचपणी करत आहोत.
ई ट्रक किती वजन पेलू शकतील, मेंन्टेनन्स, चार्जिग आदीबाबत सध्या अभ्यास सुरू आहे.
विक्रम कुमार, पुणे महापालिका आयुक्त

Wab Title : pune municipal corporation In future garbage transportation will also be done through e vehicle Implementation on an experimental basis

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Suicide | हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांच्या शासकीय वाहन चालकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या, सुसाईड नोट…

Pune District Administration | कोरोनामुळे जीव गमावलेल्या आई वडिलांच्या संपत्तीवर बालकांचाच हक्क, जिल्हा प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय