Pune Municipal Corporation । 3 लाखांत महापालिकेत नोकरी? पुण्यालगतच्या ‘या’ 23 गावातील बोगस भरतीचा कारभार उघडकीस

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – सध्या पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) हद्दीत मंजूर झालेल्या 23 गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर बोगस भरती (Bogus Recruitment) केल्याचा प्रकार समोर आला आहे. मागील वर्षात या गावांतील ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणावर बोगस भरती (Bogus Recruitment) केल्याचे पुढे आले आहे. 3 लाख रुपये द्या आणि एक वर्ष दरमहा 5 हजार रुपये पगार तसेच गावे समाविष्ट झाल्यानंतर कायमस्वरूपी नोकरी (Job) मिळेल या आमिषाने बोगस भरतीचा पायंडा पाडला होता. तर अशा प्रकारे काही ग्रामसेवक, गटविकास अधिकाऱ्यांना हाताशी धरून भरती केलेल्यांची नोकरी उर्वरित गावे पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation) समावेश झाल्याने धोक्यात आलीय.

 

यापूर्वी महापालिकेच्या (Municipal Corporation) हद्दीत एकूण 34 गावे समाविष्ट करण्यात येणार होती. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 11 गावांचा समावेश करण्यात आला. तर राहिलेली 23 गावे समाविष्ट करण्याला राज्य सरकारने (State Government) मंजुरी दिली आहे. मात्र, उर्वरित 23 गावे समावेश होण्यापूर्वी गतवर्षी या गावांतील ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणावर बोगस भरती (Bogus Recruitment) केल्याचे उघड झाले आहे. मांजरी बुद्रूक (manjari budruk) मधील एका ग्रामपंचायतीमध्ये तीस कर्मचाऱ्यांची बोगस भरती झाल्याचे एका तक्रारीवरून समोर आले आहे. परंतु ही बोगस भरती जिल्हा परिषदेने रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

या बोगस भरतीचा (Bogus Recruitment) असला प्रकार एकूण 23 गावात झाल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. बोगस रेकॉर्ड तयार करून भरतीवेळी प्रत्येक उमेदवाराकडून 3 लाख रुपये घेतले. अशा प्रकारे गेल्या वर्षभरात अशा बोगस नेमणुका केल्या आहेत. त्यासाठी महिना पाच हजार पगाराचे व्हाउचर तयार केले गेले. तसेच, 2-3 महिने चेकद्वारे पगार देऊन हे कायमस्वरूपी कर्मचारी (Staff) असल्याचा दस्तऐवज बनवला. या प्रकारामध्ये ग्रामसेवक (Gramsevak) आणि गटविकास अधिकारी (Group Development Officer) यांचा देखील हात असल्याचं कळते. आलेल्या माहितीनुसार, बावधन ग्रामपंचायतीत (Bavdhan Gram Panchayat) या प्रकारचे साधारण वीस तसेच सूसमध्ये 38 कर्मचाऱ्यांची भरती केलीय. याआधी पालिकेच्या हद्दीत 11 गावे समाविष्ट केल्यानंतर ग्रामपंचायतींत बोगस भरती केल्याचे आढळले. दरम्यान पालिकेने (Municipal Corporation) 136 कर्मचाऱ्यांना सेवेत समावून घेण्यास नकार दिला असल्यानं बाकी 23 गावामधील अशा बोगस भरती (Bogus Recruitment) केलेल्या कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात आल्याची शक्यता वर्तवली जाते.

 

या दरम्यान, विशेष म्हणजे उर्वरित असणाऱ्या 23 गावांचा समावेश करण्याला मंजुरी मिळाल्याने.
त्या रात्री ग्रामपंचायतीत (Gram panchayat) रात्रभर ग्रामसेवकांचे काम सुरू होते.
एक वर्षापूर्वीच भरतीला मान्यता दिल्याचे ठराव करून 6 महिन्यांचे पगार व्हॉउचरवर,
तर 6 महिन्यांचा पगार एक रकमी धनादेशाने देऊन हे जुनेच कर्मचारी असल्याचं रेकॉर्ड बनवलं जात असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलंय.
या प्रकारावरून पुणे महानगरपालिकेचे (Pune Municipal Corporation) उपायुक्त सुनील इंदलकर (deputy commissioner Sunil Indalkar) यांनी माहिती दिली आहे की,
पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation) समाविष्ट झालेल्या 23 गावांतील ग्रामपंचायती आणि पुणे जिल्हा परिषदेकडून (zilla parishad pune) सर्व रेकॉर्ड प्राप्त झाल्यानंतर त्याची तपासणी करण्यात येणार आहे.
त्यात जे पात्र ठरतील आणि आयुक्त जे निकष निश्‍चित करतील,
त्यांनाच नोकरीवर ठेवण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Web Titel :-Pune Municipal Corporation | job in three lakh at pmc? Bogus recruitment in 23 villages near Pune has been exposed

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Delta Variant | ‘या’ 5 प्रकारच्या लोकांना आहे ’डेल्टा व्हॅरिएंट’चा जास्त धोका, व्हायरसपासून वाचण्यासाठी करा ‘ही’ 8 कामे; जाणून घ्या

स्मार्टफोन चोरीला गेला तर सर्वप्रथम करा ‘ही’ 4 कामे, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान; जाणून घ्या

Pune News | पुण्याच्या बिबवेवाडीत हॉटेलला भीषण आग; अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे काम सुरु

स्वत:ला महाशक्ती दर्शवण्याच्या प्रयत्नात चीनच्या एयरफोर्सकडून झाली ‘ही’ मोठी चूक, जगभरात झाले हसू