पुणे महापालिका मोकाट डुक्कर दिसताच मारून टाकणार

पुणे  : पोलीसनामा ऑनलाईन

पुणे शहरात मोकाट फिरणाऱ्या डुकरांच्या उपद्रवामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. तसेच मोकाट डुकरांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन अपघात होत आहे. तसेच डुकरांमुळे संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याचा धोका आहे. त्यामुळे शहरात मोकट अथवा भटकी डुकरे दिसल्यास त्यांना ताबडतोब जप्त करून मारण्यात येणार आहे.

मोकाट डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिका अधिनियमातील तरतूदीचा आधार महापालिका प्रशासनाने घेतला आहे. महापालिकेकडून येत्या १० सप्टेंबर पासून शहरातील मोकाट डुकरे पकडण्यासाठी डुक्कर मुक्त मोहीम पुण्यात राबविण्यात येणार असल्याचे जाहीर प्रकटन महापालिकेकडून देण्यात आले आहे.

[amazon_link asins=’B07418TNB1′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’30d018d3-b10f-11e8-9453-a5ddecf088b2′]

शहरातील मोकाट डुकरांची समस्या गंभीर झाली आहे, त्यामुळे महापालिकेच्या मुख्यसभेत नगरसेवकांकडून वारंवार याबाबत तक्रारी करण्यात येत आहेत. त्यामुळे पालिकेकडून डुक्करमुक्त मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची घोषणा महापालिका आयुक्तांनी या पूर्वीच केली आहे. तसेच महापालिका हद्दीत डुक्कर पाळने हा अनधिकृत व्यावसाय असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पालिकेने या मोहीमेसाठी मोठी तयारी केली आहे.

फक्त चार मिनटे वाचवण्यासाठी आरोपी बनणार का? 

पुणे महापालिकेने एक जाहीर प्रकटन प्रसिद्ध केले आहे. या प्रकटनामध्ये महापालिका अधिनियम शेड्यूल चॅप्टर १४ (२२) (३) मध्ये कोणतेही मोकाट डुक्कर शहरात भटकताना आढळल्यास त्यास ताबडतोब मारून टाकता येईल. आणि आयुक्त निर्देश देतील त्या प्रमाणे त्या डुकराच्या प्रेताची विल्हेवाट लावता येईल. आणि अशा रितीने मारून टाकलेल्या कोणत्याही डुकरा बद्दल भरपाई मिळविण्यासाठी कोणताही दावा करता येणार नाही. त्यामुळे भटक्‍या डुकरांचा व्यावसाय करणाऱ्यांनी भटकी व मोकाट डुकरे त्वरीत महापालिका हद्दीबाहेर हलविण्यात यावी अन्यथा वरील प्रमाणे कारवाई केली जाईल असे आदेश दिले आहेत.

जाहीरात