पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ‘कोरोना’मुक्त होताच केलं ‘हे’ महान काम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी कोरोनामुक्त होताच प्लाझ्मा दान केलं आहे. इतकंच नाही तर पुणेकरांनी प्लाझ्मा दान करण्य्यासाठी पुढं यावं असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.

पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूदर 2.40 टक्के एवढा आहे. त्यामुळं शहरात 80 हजारांपेक्षा जास्त कोरोनामुक्त आहे. म्हणून प्लाझा दान करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढं यावं असं त्यांचं म्हणणं आहे.

कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूदर नियंत्रणात आणण्यासाठी शहरामधील कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींनी प्लाझ्मा दान करण्यासाठी मोठ्या संख्येनं पुढं यावं असं आवाहन मोहोळ यांनी केलं आहे.

मोहोळ असंही म्हणाले की, आतापर्यंत 750 कोरोना मुक्त व्यक्ती प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे आल्या आहेत.

पुणे महापालिकेच्या कोरोनामुक्त झालेल्या 210 व्यक्ती प्लाझ्मा दान करण्यासाठी पात्र असून यात पहिला नमुना महापौर मोहोळ यांनी दिला आहे.