pune municipal corporation | पहिल्या तिमाहीत महापालिकेचे उत्पन्न घटले; महागाई व वेतनामुळे खर्च वाढला

पैसे नसताना मोठ्या रकमांच्या निविदा काढल्या जात असल्याने महापालिका (pune municipal corporation) दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर - विरोधकांचा हल्लाबोल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महानगरपालिकेचे pune municipal corporation उत्पन्न घटले आहे. पेट्रोल, डिझेल, वीज दरवाढ, कर्मचार्‍यांच्या सातव्या वेतन 7th pay commission आयोगापोटी ५०० कोटी रुपयांचा वाढलेला बोजा, पीएमपीएमएलची (PMPML) ऐतिहासिक तूट वाढल्याने खर्च मात्र वाढल्याने ताळेबंदाचा बॅलन्स राखण्यासाठी विकासकामांची प्राथमिकता लक्षात घेउन कामांचे नियोजन करण्यासाठी वित्तिय समितीची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार pune municipal corporation commissioner vikram kumar यांनी आज सर्वसाधारण सभेमध्ये दिली. तर विरोधकांनी आयुक्तांचा हा खुलासा सत्य मानला तर महापालिका pune municipal corporation आर्थिक दिवाळखोरीकडे निघाली असून आर्थिक स्थिती चांगली नसताना मोठ्या रकमांच्या निविदा काढून महापालिकेवरील आर्थिक दायित्व कशासाठी वाढवित आहात? अशी टीका सत्ताधारी भाजपवर (BJP) केली आहे.

कोरोनामुळे (Corona) मागील वर्षापासून महापालिकेचे pune municipal corporation उत्पन्न घटले आहे. महसुली खर्चासोबतच कोरोनावरील उपचारासाठी खर्च करावा लागत असल्याने प्रशासनाने वर्षभरापासून अनेक कामांना चाप लावला आहे. यंदाही महापालिकेने ८ हजार ३६० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक मंजुर केले आहे. मात्र, पहिल्या तिमाहीमध्ये एप्रिल व मे महिन्यांत कोरोनाची दुसरी लाट आल्याने अनेक कामांना चाप लावला आहे. कामांच्या प्राथमिकतेनुसार महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील वित्तिय समितीमार्फत प्रस्तावांना मान्यता देण्यात येत आहे. अशातच या समितीकडून फक्त प्रमुख पदाधिकार्‍यांच्या कामांना मान्यता देण्यात येत असल्याने सर्वच पक्षाच्या नगरसेवकांमध्ये असंतोष पसरला आहे. यावरून सर्वसाधारण सभेमध्ये विरोधकांनी प्रशासनाला धारेवर धरले.

यावर स्पष्टिकरण देताना आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले, की यंदाच्या आर्थिक वर्षात पहिल्या तिमाहीमध्ये महापालिकेला अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. नुकतेच कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून तिसर्‍या लाटेचे भाकित व्यक्त करण्यात येत आहे. मागील आर्थिक वर्षात ४ हजार ६७० कोटी रुपये उत्पन्न मिळाले तर ४ हजार ६६७ कोटी रुपये खर्च झाले आहेत. यंदा ८ हजार ३६० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक आहे. मात्र, साडेपाच हजार कोटी रुपये उत्पन्न मिळेल असा अंदाज आहे.

प्रशासनाने अंदाजपत्रक मांडताना सुचवलेली करवाढ रद्द करण्यात आली आहे.
उलट प्रामाणिक करदात्यांना करामध्ये सूट दिल्याने उत्पन्न घटले आहे.
महापालिका आणि पीएमपीएमएलच्या कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोगानुसार वेतन द्यावे लागणार असल्याने अतिरिक्त ६५० कोटी रुपयांचा बोजा वाढला आहे.
पेट्रोल, डिझेल (Petrol, diesel) आणि विजेचे दर वाढत असल्याने खर्च वाढत आहे.
अंदाजपत्रकात उत्पन्न वाढीसाठी सुचविण्यात आलेल्या सदनिका विक्री तसेच ऍमेनिटी स्पेस भाडेतत्वावर देण्याच्या योजनांबाबत भिन्न मतप्रवाह असल्याने यातून निश्‍चित उत्पन्न मिळेल ? हे आताच सांगता येणार नाही.
साधारणपणे मागीलवर्षीच्या तुलनेत १ हजार २०० कोटी रुपयांनी महसुली खर्च वाढून ४ हजार ३०० कोटी रुपयांवर पोहोचणार आहे.
त्यामुळे पालिकेकडे भांडवली कामासाठी जेमतेम बाराशे ते तेराशे रुपये उपलब्ध होणार आहेत.
त्यामुळेच वित्तिय समितीच्या माध्यमातून उपलब्ध निधीचे नियोजन करण्यात येत आहे.

महापालिका आयुक्तांनी केलेल्या या स्पष्टीकरणावरून विरोधकांनी प्रशासनावर आणि सत्ताधार्‍यांवरही हल्ला चढविला.
निवडणुका काही महिन्यांवर आल्या असताना किरकोळ कामेही केली नाही तर नागरिक आम्हाला दारात उभे करणार नाहीत.
निधी नसताना प्रशासनाकडून मोठ्या प्रकल्पांच्या कोट्यवधी रुपयांच्या निविदा काढल्या जात आहेत.
पुढील काही वर्षे या खर्चाच्या दायित्वाला सर्वसाधारण सभेची मान्यता न घेताच प्रशासनातील अधिकारी कोणाच्या सांगण्यावर परस्पर निविदा काढत आहेत?
ही दिवाळखोरीची लक्षणे असून चार वर्षात महापालिका आर्थिकदृष्ट्या खड्ड्यात घातल्याचा आरोप नगरसेवक सुभाष जगताप, आबा बागुल, पृथ्वीराज सुतार, अरविंद शिंदे यांनी यावेळी केला.

Web Titel :- pune municipal corporation | Municipal revenue fell in the first quarter; Inflation and wages pushed up spending

हे देखील वाचा

PM Narendra Modi | लोकप्रियतेत पीएम नरेंद्र मोदीच सर्वोत्कृष्ट नेते; जो बायडन यांच्यासह 13 जागतिक नेत्यांना टाकलं मागे

धक्कादायक ! गुजरातच्या साबरमती नदीत सापडला कोविड-19 व्हायरस, तपासणीत सर्व नमुने आढळले संक्रमित

Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये गुंतवा 150 रुपये, मॅच्युरिटीनंतर मिळतील 20 लाख; अशी करा गुंतवणूक