पुणे मनपा : स्थायीसाठी रासने, वर्षा तापकीर तर सभागृह नेतेपदासाठी घाटे, लडकतांचं नाव चर्चेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीचे निकाल आणि राज्यातील स्ततातरानंतर महापालिकेतही भाजप मध्ये उलथापालथ सुरू झाली आहे. एक व्यक्ती एक पद या तत्वानुसार आमदार पदी निवडून आलेले स्थायी समिती अध्यक्ष सुनिल कांबळे आणि पीएमपीएल चे संचालक सिद्धार्थ शिरोळे यांना त्यांच्या पदाचा राजीनामा देण्यास सांगितले आहेत. तर सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनाही पदाचा राजीनामा देण्यास सांगितले आहे.

दरम्यान, या पदांसाठी भाजप मधील इच्छुकांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी ज्येष्ठ नगरसेवक हेमंत रासने आणि वर्षा तापकीर यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. तर सभागृह नेतेपद धीरज घाटे अथवा महेश लडकत यांच्याकडे जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
राज्यात नुकतेच झालेल्या विधानसभा निवडणुकी मध्ये शहरातून आठपैकी चार जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत. यामध्ये माजी महापौर मुक्ता टिळक, स्थायी समिती अध्यक्ष सुनिल कांबळे आणि पीएमपीएमएल चे संचालक सिद्धार्थ शिरोळे यांचा समावेश आहे.

मागच्याच आठवड्यात मुक्ता टिळक यांचा कार्यकाळ संपुष्टात आला. त्यांच्या जागी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांची निवड करण्यात आली. त्याचवेळी सभागृह नेता बदलला जाईल असे संकेत मिळत होते. तर राज्यात भाजपचे सरकार आल्यास सुनिल कांबळे यांना राजीनामा देण्यास सांगितले जाईल अशी चर्चा होती. परंतु आज अचानक कांबळे यांनाही अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Visit : Policenama.com