Pune Municipal Corporation (PMC) | पुणे पालिकेतील कर्मचाऱ्यांच्या कालबद्ध पदोन्नतीला मंजुरी, प्रस्तावावर आयुक्तांची स्वाक्षरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Municipal Corporation (PMC) | पुणे महानगरपालिकेतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना कालबद्ध पदोन्नतीचा प्रस्तावावर आयुक्त विक्रम कुमार (Commissioner Vikram Kumar) यांनी स्वाक्षरी केली असून परिपत्रक काढण्यात आले असल्याची माहिती उपायुक्त सचिन इथापे (Deputy Commissioner Sachin Ethape) यांनी दिली. याचा लाभ पालिकेतील (Pune Municipal Corporation (PMC) सहा हजार कर्मचाऱ्यांना होणार आहे.

यापूर्वी सहाव्या वेतन आयोगानुसार (6th Pay Commission) कालबद्ध पदोन्नती करण्यात येत होती. मात्र आता सातव्या वेतन आयोगानुसार (7th Pay Commission) पदोन्नतीचे करण्यात आले आहेत. याचा सहा हजार कर्मचाऱ्यांना लाभ होऊ शकतो. कालबद्ध पदोन्नतीनुसार केवळ वेतनात वाढ होणार आहे. मात्र पद तेच राहणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (Pune Municipal Corporation (PMC)

कर्मचाऱ्यांना याचा लाभ देण्यासाठी प्रत्येक प्रकरण हे पदोन्नती समिती (Promotion Committee) पुढे ठेवले जाणार आहे. समितीने मान्यता दिल्यानंतर याचा लाभ संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. याशिवाय पदोन्नती मिळवताना इतर अटी, शर्थी, निकष लागू राहणार असल्याचे देखील प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

अनेक वर्ष महापालिकेत काम करुन देखील काही तांत्रिक कारणामुळे कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचे पद मिळत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पद आणि वेतन यापासून वंचित राहावे लागते. यावर तोडगा काढून दोन टप्पे करण्यात आले. ज्या कर्मचाऱ्यांची सेवा 12 वर्ष आणि 24 वर्ष पूर्ण झाली असेल, त्यांना त्यांच्या सेवेनुसार वेतनवाढ देण्यात आली. पद तेच असले तरी कर्मचाऱ्यांना वाढीव वेतन मिळू लागले. 1994 साली हा नियम लागू करण्यात आला होता. यामध्ये 2003 साली सुधारणा करण्यात आली. त्यानंतर सातव्या वेतन आयोगानुसार सरकार ने 2016 सालापासून दोन ऐवजी तीन टप्पे केले. त्यामध्ये 10 वर्ष, 20 वर्ष आणि 30 वर्ष असे टप्पे करण्यात आले आहेत. त्यानुसार याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त यांच्या समोर ठेवण्यात आला होता, त्यास मंजुरी मिळाल्याचे इथापे यांनी नमूद केले.

नोकर भरतीचा पुढील टप्पा पुढच्या महिन्यात

– सह आयुक्त पदावर काम करणारे किशोरी शिंदे आणि युनुस पठाण यांना उपायुक्त या पदावर बढती देण्यात आली आहे.
– यापुर्वी १२ आणि २४ योजनेचा लाभ घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नतीनुसार लाभ मिळविण्यासाठी वाट पहावी लागणार
– नोकर भरतीचा पुढील टप्पा पुढील महीन्यात सुरु होणार आहे. यामध्ये तीनशे जागा भरल्या जाणार आहेत.
अग्निशमन दलातील विविध पदे, आरोग्य निरीक्षक, विद्युत अभियंता, डॉक्टर्स इत्यादी पदांचा समावेश आहे.

लोकसंख्येच्या तुलनेत कर्मचारी संख्या कमी-आयुक्त

महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी यांची संख्या ही लोकसंख्येच्या तुलनेत कमी असल्यामुळे संवर्ग
वाढवून मिळविण्यासाठी स्वतंत्र प्रस्ताव करून राज्य सरकारला पाठविण्यात येणार आहे,
अशी माहीती आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.
हा प्रस्ताव पाठविताना एकुण खर्चामध्ये आस्थापनाचा खर्च हा अधिक असणार नाही याचा विचार करावा
लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच समाविष्ठ गावांतील 600 कर्मचारी सेवेत कायम होतील.

Web Title :-  Pune Municipal Corporation (PMC) | Approval of time-bound promotion of employees of Pune Municipality, Commissioner’s signature on the proposal