Pune Municipal Corporation (PMC) Budget | पुणे महापालिकेचे 2023-24 चे अंदाजपत्रक 9 हजार 515 कोटी रुपयांचे; कुठलिही करवाढ नाही, मात्र…

पुणे – Pune Municipal Corporation (PMC) Budget | कुठलिही करवाढ नाही, मात्र PMRDA कडून मिळणारे उत्पन्न, समाविष्ट गावातून अपेक्षित वाढीव कर आणि कर्जरोखे गृहीत धरून महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी आज २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या ९ हजार ५१५ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला मंजुरी दिली. आगामी वर्षामध्ये चोवीस तास पाणी पुरवठा (Pune PMC 24×7 Water Supply Project) आणि पंतप्रधान आवास योजना (Pradhan Mantri (PM) Awas Yojana) हे दोन प्रकल्प करण्यात येतील. तसेच जायका नदी सुधार (JICA Project), नदी काठ सुधार योजनेसोबतच (Pune Mula-Mula River Rejuvenation) समाविष्ट गावांती पाणी पुरवठा, ड्रेनेज लाईन, पावसाळी गटारांच्या कामे युद्धपातळीवर करण्यासाठी अंदाजपत्रकात भरिव तरतूद करण्यात आल्याचे विक्रम कुमार यांनी पत्रकार स्पष्ट केले. (Pune Municipal Corporation (PMC) Budget)

महापालिकेमध्ये प्रशासकराज असल्याने सलग दुसर्‍या वर्षी प्रशासक या नात्याने विक्रम कुमार यांनी २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकाला मंजुरी दिली. यानंतर त्यांनी अंदाजपत्रकातील जमा, खर्च आणि प्रकल्पांविषयीची माहिती पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त, डॉ. कुणाल खेमनार (Dr Kunal Khemnar IAS), रविंद्र बिनवडे (Ravindra Binwade IAS), विकास ढाकणे (Vikas Dhakane PMC), शहर अभियंता प्रशांत वाघमारे (City Engineer Prashant Waghmare), मुख्य लेखापाल उल्का कळसकर (Chief Accountant Ulka Kalskar) आदी उपस्थित होते. (Pune Municipal Corporation (PMC) Budget)

आगामी वर्षी कुठलिही करवाढ सुचविलेली नाही, असे सांगतानाच विक्रम कुमार (Vikram Kumar PMC) म्हणाले की शासनाने ४० टक्के कर (Pune PMC Property Tax) सवलत पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. २०१९ पासून नव्याने कर आकारणी झालेल्या मिळकतींकडून १०० टक्के कर आकारणी केली जात आहे. उर्वरीत जुन्या मिळकतींना केवळ नोटीसेस पाठविल्या आहेत. राज्य मंत्री मंडळाचा अंतिम निर्णय आल्यानंतर सुधारीत बिले पाठविण्यात येतील. तसेच समाविष्ट केलेल्या गावांमधून पाच वर्षात २०-४०-६०-८० टक्के आणि पाचव्या वर्षी १०० टक्के कर आकारणी होणार असल्याने कराचे उत्पन्न वाढणार आहे.

समाविष्ट गावातील बांधकाम परवानग्या सध्या पीएमआरडीएकडे आहेत. पुढील वर्षी हे अधिकार महापालिकेकडे येणार आहेत. तसेच या गावांतील बांधकाम परवानगीतून मिळालेले ७५ टक्के उत्पन्न महापालिकेला मिळणार आहे. समाविष्टन गावातील ड्रेनेज लाईन प्रकल्पाचा आराखडा शेवटच्या टप्प्यात असुन या प्रकल्पासाठी जायका व अन्य संस्थांकडून ४०० कोटी रुपये कर्ज घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे महापालिकेला पुढील आर्थिक वर्षात ९ हजार ५१५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल, असा विश्‍वास आहे.

महापालिकेने समाविष्ट गावातील सुमारे ७०० कर्मचार्‍यांना सेवेत कायम केले आहे. सुमारे ७५० नवीन कर्मचार्‍यांची भरती केली असून सातव्या वेतन आयोगामुळे कर्मचार्‍यांवरील पगाराचा खर्च ३ हजार कोटी रुपयांपर्यंत होणार आहे.
चोवीस तास पाणी पुरवठा योजना फेब्रुवारी २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.
यामुळे पाणी पुरवठा विभागासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत २९०० घरांच्या प्रकल्पाचे काम देखिल यावर्षी पूर्णत्वास नेण्यात येणार आहे.

आगामी आर्थिक वर्षात शहरात ८ नवीन उड्डाणपूल उभारण्यात येणार आहेत.
नियमित मिळकत कर भरणार्‍या नागरिकांसाठी आणखी एक योजना राबविण्यात येणार आहे.
शहरातील ऍमेनिटी स्पेस तसेच ओपन स्पेसवर पथारी व्यावसायीकांसाठी हॉकर्स पार्क सुरू करण्यात येणार आहेत,
अशी माहिती विक्रम कुमार यांनी यावेळी दिली.

नगरसेवकांच्या संख्येनुसार प्रत्येक वॉर्डमधील छोट्या कामांसाठी एक कोटी रुपये याप्रमाणे १७० कोटी रुपयांची
तरतूद करण्यात आली आहे. प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयाला ५ कोटी याप्रमाणे १५ क्षेत्रीय कार्यालयांसाठी
७५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अंदाजपत्रकामध्ये समाविष्ट २३ गावांसाठी पाणी पुरवठा,
ड्रेनेज आणि पावसाळी गटारांच्या कामांसाठी मोठ्या प्रमाणावर तरतूद केली आहे.
पुढील काही महिन्यांत आंबेगाव, वाघोली, मांजरी येथील पाणी पुरवठ्याची कामे देखिल सुरू होतील.
खोदाईची कामे पूर्ण झाल्यानंतर रस्त्यांची कामे करण्यात येतील, असे विक्रम कुमार यांनी नमूद केले.

Web Title :- Pune Municipal Corporation (PMC) Budget | Pune Municipal Corporation (PMC) Budget 2023-24 Rs 9 thousand 515 crore; No tax increase, but…

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jalna Crime News | जमिनीच्या वादातून आरोपीकडून सावत्र भावाची हत्या; जालन्यामधील घटना

Pradeep Sarkar Pass Away | दिग्दर्शक प्रदीप सरकार यांचे अल्पशा आजाराने निधन