Pune Municipal Corporation (PMC) | उन्हाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील उद्यानांच्या वेळेत बदल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Municipal Corporation (PMC) | उन्हाळ्यात महापालिकेच्या उद्यानांमध्ये (Mahapalika Udyan) पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत असते. यातूनच महापालिकेला उत्पन्न मिळत असते. मात्र, वाढत्या उन्हामुळे पुणे शहरातील (Pune City) उद्यानांची वेळ वाढवून (Increasing Garden Time) मिळावी अशी मागणी नागरिकांनी केली होती. पुणे महापालिकेच्या Pune Municipal Corporation (PMC) उद्यान विभागाने नागरिकांच्या मागणीचा विचार करुन शहरातील महापालिकेची उद्याने उद्यापासून (शनिवार) रात्री 8 ऐवजी 9 वाजेपर्यंत खुली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार वेळेत बदल करण्याचे आदेश उद्यान विभागाकडून आज (शुक्रवार) काढण्यात आले आहेत.

 

पुणे महापालिका तसेच फक्त आणि फक्त पुण्यातील राजकारणाच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

शहरात महापालिकेची 205 उद्याने, मत्सालय (Aquarium) व प्राणीसंग्रहालय (Zoo) आहेत.
पुणे शहरातील विविध उद्यानांना प्रवेश शुल्क असल्याने त्याद्वारे पुणे महानगरपालिकेला Pune Municipal Corporation (PMC) मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळते.
दरम्यान 15 मार्च 2019 पासून कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे शहरातील उद्याने नागरिकांसाठी बंद करण्यात आली होती.
यानंतर ब्रेक द चैन (Break the Chain) अंतर्गत टप्प्या टप्प्याने अटी व शर्तींसह उद्याने सुरु करण्यात आली.
सध्या उद्यानांची वेळ सकाळी 6 ते 10 व सायंकाळी 4 ते 8 अशी आहे.

 

सध्या उन्हाळा (Summer) सुरु असून नागरिक, लहान मुले सायंकाळच्या वेळी उद्यानांमध्ये मोठ्या प्रमाणात येतात.
त्या पार्श्वभूमीवर उद्यानांची वेळ वाढवण्याची मागणी नागरिकांनी केली होती.
त्यानुसार 9 एप्रिल ते 15 जून 2022 या कालावधीकरीता पुणे शहरातील उद्यानांच्या वेळा वाढवण्यात आल्या आहे.
उद्याने सकाळी 6 ते 11 व सायंकाळी 4 ते 9 तर मत्सालय सकाळी 8 ते 11 आणि सायंकाळी 4 ते 9 या वेळेत सुरु
राहतील अशी माहिती मुख्य उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे (Chief Park Superintendent Ashok Ghorpade) यांनी दिली.

 

Web Title :- Pune Municipal Corporation (PMC) | Changes in the timing of parks (Mahapalika Udyan) in Pune city on the background of season

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sonakshi Sinha Pregnancy Rumours | सोनाक्षी सिन्हानं शेअर केलेल्या फोटोवर नेटकरी म्हणाले – ‘तू गरोदर आहेस का?’

 

ST Employees Protest | ‘एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामागचा सूत्रधार शोधणार, दोषींवर कारवाई करणार’, गृहमंत्री वळसे पाटील यांची माहिती

 

Nilesh Rane On Sharad Pawar | ‘पवार साहेब आता तरी संन्यास घ्या अन् गप्प घरी बसा’ – निलेश राणे