Pune Municipal Corporation (PMC) | प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या गोळा करा अन् मिळवा आकर्षक बक्षीस, पुणे महापालिकेची अनोखी स्पर्धा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Municipal Corporation (PMC) | प्लॅस्टीकच्या रिकाम्या बाटल्या गोळा करा आणि बक्षीस मिळवा ! स्वच्छतेविषयी जनजागृती करण्याच्या हेतूने महापालिकेने (Pune Municipal Corporation (PMC) या अनोख्या स्पर्धेचे (Competition) आयोजन केले आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना इ बाईक, स्मार्ट फोन सारखी आकर्षक बक्षीसे दिली जाणार आहेत.

शहरात निर्माण होणाऱ्या प्लास्टिक कचऱ्याचे (Plastic Waste) व्यवस्थापन करणे, दैनंदिन वापरात प्लास्टीकाचा वापर कमी करणे, नागरिकांमध्ये जनजागृती करणे, पर्यायी जैवविघटनशील पदार्थ (जूट, कापड इ.) यांच्या वापरास प्रोत्साहन देण्याच्या हेतूनही ही स्पर्धा आयोजित केली गेली आहे. महापालिकेच्या 15 क्षेत्रिय कार्यालय स्तरावर (Pune Municipal Corporation (PMC) ही प्लास्टिक बॉटल्स संकलन स्पर्धा 28 फेब्रुवारीपर्यंत पार पडणार आहे.

ही स्पर्धा 1) वैयक्तिक – सर्व वयोगटातील नागरिक, 2) शैक्षणिक संस्था – शाळा/महाविद्यालये, 3) संस्थात्मक – गृहनिर्माण संस्था/ व्यावसायिक आस्थापना/स्वयंसेवी संस्था/ खाजगी संस्था/ गणेश मंडळे इ. अशा तीन गटात आयोजित केली जाणार आहे. सर्वांत जास्त प्लास्टीक बाटल्या जमा करणाऱ्यांना विजयी घोषित केले जाणार आहे, अशी माहीती घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या प्रमुख आशा राऊत (Asha Raut) यांनी दिली.

स्पर्धेत कसे सहभागी व्हाल?

नागरिकांच्या सहभागाकरीता ऑनलाईन गुगल फॉर्म तयार करण्यात आला आहे. तो https://forms.gle/5jpGJ1hAa3LAiXFB9 या लिंकद्वारे उपलब्ध केला गेला आहे.
वैयक्तिक गटातून सहभागी होणाऱ्या नागरिकांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन न करता संबंधीत आरोग्य कोठीवर प्लास्टिक बॉटल्स (Plastic Bottles) देतेवेळी आपली नोंदणी करावयाची आहे.
शैक्षणिक संस्था व संस्थात्मक गटातील सहभागींना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक आहे.

कुठे जमा कराव्या लागणार बाटल्या?

प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांतर्गत (Regional Office) 5 आरोग्य कोठ्या नागरिकांना संकलित केलेले प्लास्टिक जमा करण्यासाठी उपलब्ध असणार आहेत. या ठिकाणी नागरिक दर शनिवार व रविवार या दिवशी सकाळी 9 ते सायं. 5 या वेळेत संकलित प्लास्टिक बॉटल्स जमा करू शकतील. संकलित केलेल्या प्लास्टिक बॉटल्सचा अहवाल क्षेत्रिय कार्यालय स्तरावर जतन केला जाईल.

अशी पार पडेल स्पर्धा

या स्पर्धेच्या आयोजनात कमिन्स इंडिया प्रा.लि. (Cummins India Pvt. Ltd.) यांचे सहकार्य मिळाले असुन, त्या कंपनीमार्फत प्रत्येक आरोग्य कोठीसाठी एक स्वयंसेवक नियुक्त केला जाणार आहे. या स्वयंसेवक यांमार्फत स्पर्धेसाठी प्राप्त प्रवेशिकांची छाननी करणे, साप्ताहिक स्वरूपात संकलित केल्या जाणाऱ्या प्लास्टिक बॉटल्सचे वजन करून त्याचा अहवाल तयार केला जाईल. स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात सर्व सहभागींचे परीक्षण करून अंतिम विजेते जाहीर केले जाणार आहे.

जमा प्लास्टिक बाटल्यांचे काय करणार?

संकलित करण्यात आलेल्या बाटल्यांचा उपयोग हा आकर्षक म्युरल्स, पेव्हर ब्लॉक, इंटरलॉकिंग बॉक्स इ. साहित्य बनवून त्याचा वापर शहर सौदर्यीकरण किंवा उद्याने, रस्ते, फुटपाथ यांचे सुशोभीकरणासाठी वापर केला जाईल.

स्वंयधोषणापत्र भरून देण्याचे बंधन

स्पर्धकांनी कोणतेही प्लास्टिक संबंधित व्यावसायिक, प्लास्टिक मॅन्युफॅक्चरर्स, प्लास्टिक विक्रेते, रीसेलर रिसायकलर् डिलर्स, केटरर्स, हॉटेल व्यावसायिक, भंगार माल विक्रेते, कचरा वेचक यांचेकडून प्लास्टिक घेऊन मनपाकडे जमा करू नये. याबाबतचे स्वयंघोषणापत्र प्रत्येक स्पर्धकाने भरून देणे बंधनकारक राहील. या नियमाचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास स्पर्धकास बाद केले जाईल.

हे स्पर्धेत सहभागी होऊ शकत नाही

या स्पर्धेमध्ये कोणतेही प्लास्टिक संबंधित व्यावसायिक, प्लास्टिक मॅन्युफॅक्चरर्स, प्लास्टिक विक्रेते,
रीसेलर रिसायकलर् डिलर्स, केटरर्स, हॉटेल व्यावसायिक, भंगार माल विक्रेते,
कचरा वेचक इ. किंवा त्यांचे नातेवाईक सहभागी होऊ शकत नाहीत.

या स्पर्धेतील विजेत्यांना महापालिकेकडून इ बाईक, स्मार्ट फोन आदी आकर्षक स्वरुपाची बक्षीसे दिली जाणार आहे.
प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या स्तरावर प्रत्येक गटात पहील्या तीन क्रमांकांना बक्षीस दिले जाईल.
तसेच शहर पातळीवरही तीन क्रमांकाची बक्षीस देण्याचा प्रशासन विचार करीत आहे.
असे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार (Addl Commissioner Kunal Khemnar) यांनी सांगितले.

Web Title :- Pune Municipal Corporation (PMC) | Collect empty plastic bottles and win
attractive prizes, unique competition of Pune Municipal Corporation

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune PMPML News | पीएमपीएमएल कडून 10 नवीन बसमार्ग तर 4 बसमार्गांचा विस्तार

Aaliyah Kashyap | ‘या’ दिग्दर्शकाची मुलगी बी टाउन अभिनेत्री दिशा पाटनीलाही देते टक्कर; फोटो व्हायरल

Jasmin Bhasin | ‘बिग बॉस’फेम जस्मिन भसीनने कास्टिंग काऊच बाबत केला ‘हा’ धक्कादायक खुलासा