Pune Municipal Corporation-PMC | पुणे महापालिकेकडून 68 रुग्णालयांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक डोस उपलब्ध; 18 ते 59 वर्षे वयोगटातील नागरिकांना डोस मोफत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Municipal Corporation-PMC | केंद्र सरकारच्या (Central Government) निर्णयानुसार पुणे महानगरपालिकेने (Pune Municipal Corporation-PMC) आजपासून (शुक्रवार) 15 क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीमधील 68 दवाखान्यांमध्ये कोव्हॅक्सीन (Covaxin) आणि कोविशिल्ड (Covishield) दोन्ही लसींचे डोस उपलब्ध केले आहेत. या ठिकाणी शहरातील 18 ते 59 वर्षे वयोगटातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस (Corona Preventive Vaccine) मोफत दिला जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

 

ज्या नागरिकांचा दुसरा डोस घेतल्यानंतर 6 महिने किंवा 26 आठवडे पूर्ण झाले आहेत, अशा नागरिकांसह गेल्या 3 महिन्यामध्ये कोरोनाचा संसर्ग न झालेले नागरिक प्रतिबंधात्मक डोससाठी पात्र राहणार आहेत. पात्र नागरिकांनी घरानजदीक महानगरपालिकेच्या दवाखाना किंवा रुग्णालयात जाऊन मोफत लस घ्यावी, असं आवाहन महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांनी केले आहे. (Pune Municipal Corporation-PMC)

 

महापालिकेचे लसीकरण अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर (Dr. Suryakant Deokar) म्हणाले, “नागरिकांना ऑनलाइन नोंदणी करून अथवा प्रत्यक्ष केंद्रावर येऊन नोंदणी करून देखील लस घेता येईल. निश्चित कोट्यानुसार या लसींचे डोस उपलब्ध होतील. ऑनलाइन बुकिंगसाठीचे स्लॉट्स सकाळी 8 वाजता खुले होतील.”

 

Web Title :- Pune Municipal Corporation-PMC | corona preventive dose in 68 hospitals from pune municipal corporation pmc

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Madras High Court | पत्नीने मंगळसूत्र काढणं ही सर्वोच्च पातळीवरील मानसिक क्रूरता; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

 

CM Eknath Shinde | ‘आता आपलं सरकार, शिवसैनिकांवर अन्याय होऊ देणार नाही’ – एकनाथ शिंदे

 

Maharashtra Petrol-Diesel Price | दिलासा ! राज्यात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी घट; जाणून घ्या आपल्या शहरांतील नवे दर