Pune Municipal Corporation (PMC) | जंतनाशक दिन ! पुणे महानगरपालिका देणार शहरातील 4.5 लाख मुलांना मोफत जंतनाशक गोळ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य शासनामार्फत (Maharashtra State Government) दर सहा महिन्यातून एकदा जंतनाशक दिन मोहिम (Deworming Day) व उपक्रम राबवला जातो. पुणे महापालिकेकडून Pune Municipal Corporation (PMC) 25 एप्रिल ते 2 मे या कालावधीत ही मोहिम राबवली जाणार आहे. यामध्ये 1 ते 19 या वयोगटातील सर्व मुला-मुलींना संस्था स्तरावर म्हणजे शाळांमध्ये आणि शाळा बाह्य मुला-मुलींना घरोघरी जाऊन जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे. पुणे महापालिकेकडून Pune Municipal Corporation (PMC) 1 ते 19 वर्षे वयोगटातील अंगणवाडी (Anganwadi) मध्ये जाणाऱ्या, शाळेत जाणाऱ्या व महाविद्यालयात (College) जाणाऱ्या सर्व मुला-मुलींना जंतसंसर्गाच्या प्रादुर्भावामुळे होणारे कुपोषण, रक्तक्षय यासारखे दुष्परिणाम रोखण्यासाठी मोफत गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे.

जंतनाशक दिन मोहिमे अंतर्गत लहान मुलामुलींना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करून लहान बालकांचे व विद्यार्थ्यांचे होणारे शारीरिक, शैक्षणिक व मानसिक नुकसान कमी करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. सदर मोहिमे अंतर्गत पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) कार्यक्षेत्रामधील सर्व शासकीय शाळा (Government School), खाजगी शाळा (Private School), आश्रम शाळा (Ashram School), आर्मी स्कूल (Army School), सीबीएससी स्कूल (CBSC School), नवोदय विद्यालय (Navodaya Vidyalaya), मिशनरी स्कूल (Missionary School), गुरुकुल (Gurukul), संस्कार केंद्रे (Sanskar Kendra) व मदरसे (Madrasas) येथे शिकणाऱ्या सर्व मुला-मुलींना 25 एप्रिल 2022 रोजी जंतनाशक गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. (Pune Municipal Corporation (PMC)

 

अंगणवाडी, शाळा व महाविद्यालय येथे शिकणाऱ्या मुलांना शाळेतील शिक्षकांमार्फत तसेच शाळाबाह्य मुलांना पुणे महानगरपालिकेच्या आशा स्वयंसेविका यांच्यामार्फत जंतनाशक गोळ्यांचे वितरण करण्यात येणार आहे. याबाबत पुणे महानगरपालिकेच्या दवाखान्यातील वैद्यकीय अधिकारी व क्षेत्रिय वैद्यकीय अधिकारी यांचे मार्फत समन्वय साधला जाणार आहे. सर्व मुलामुलींनी 25 एप्रिल रोजी जंतनाशक गोळ्या घ्याव्यात व ज्यांना त्या दिवशी घेता येणार नाहीत त्यांनी दिनांक 29 एप्रिल २०२२ या मॉप अपच्या दिवशी जंतनाशक गोळ्या घ्याव्यात, असे आवाहन पुणे महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार (Commissioner and Administrator Vikram Kumar) यांनी केले आहे.

 

Web Title :- Pune Municipal Corporation (PMC) | Deworming Day! Pune Municipal Corporation will provide free deworming tablets to 4.5 lakh children in the city

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा