Pune Municipal Corporation (PMC) Election | पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना 17 मेला जाहीर होणार, राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

0
286
Pune Municipal Corporation (PMC) Election | pune municipal corporation pmc election 2022 update final ward draft structure of pmc will announced 17th may
File Photo

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Municipal Corporation (PMC) Election | सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) निवडणूक घेण्यासाठी कंबर कसली आहे. 17 मे रोजी पुणे महापालिकेची (Pune Municipal Corporation (PMC) Election) अंतिम प्रभाग रचना (Ward Structure) जाहीर होणार आहे. त्यामुळे पुढील महिनाभरात निवडणूक होण्याची शक्यता आहे. याबाबत पुणे महापालिकेला आदेश प्राप्त झाले आहे.

 

राज्य निवडणूक आयोगानं राज्यातील महापालिका निवडणुकीसंदर्भात महत्वाचं परिपत्रक जारी केलं आहे. नवी मुंबई (Navi Mumbai),
वसई विरार (Vasai Virar), उल्हासनगर (Ulhasnagar), कोल्हापूर (Kolhapur), अकोला (Akola), अमरावती (Amravati), नागपूर (Nagpur),
सोलापूर (Solapur), नाशिक (Nashik), पुणे (Pune), पिंपरी-चिंचवड
(Pimpri-Chinchwad), कल्याण डोंबिवली (Kalyan Dombivali) , मुंबई (Mumbai) आणि ठाणे (Thane) महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी अंतिम प्रभाग रचना शासनाच्या राजपत्रात 17 मे रोजी प्रसिद्ध करण्यात येतील,
असं राज्य निवडणूक आयोगानं म्हटलं आहे.

 

सर्वोच्च न्यायालयानं ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भातील (OBC Political Reservation) सुनावणी दरम्यान महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य
संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया दोन आठवड्यात जाहीर करण्यास सांगितले होते. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने हे परिपत्रक जारी केलं आहे.
आजच सुप्रीम कोर्टाने मध्य प्रदेश सरकारला झटका देत तिथं देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करण्यास सांगितले आहे.

 

आठवडाभरात आरक्षण जाहीर होणार

 

17 मे रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर पुढील आठवड्याभरात निवडणूक आयोगाकडून आरक्षणाची सोडत काढली जाईल.
त्याच वेळी मतदार याद्या फोडून त्यावर हरकती सूचनांची कार्यवाही पुढील 10 दिवसांत होऊ शकते.
त्यामुळे जून मध्ये निवडणुकांचे बिगूल वाजण्याची शक्यता आहे.

Web Title :- pune municipal corporation pmc election 2022 updatefinal ward draft structure of pmc will announced 17th may


Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Stock To Buy Today | 310 रुपयांच्या पुढे जाईल टाटा ग्रुपचा हा मल्टीबॅगर शेअर, आता स्वस्तात मिळत आहे स्टॉक, एक्सपर्टने म्हटले – खरेदी करा

Neha Sharma Superhot Look | नेहा शर्माच्या हॉटनेसमुळं चुकला नेटकऱ्यांच्या काळजाचा ठोका, पाहा व्हायरल फोटो..

Post Office Scheme | एकरकमी 10 लाख करा जमा, मॅच्युरिटीवर गॅरंटेड मिळतील 13.90 लाख; कॅलक्युलेशन