Pune Municipal Corporation (PMC) | पुणे महापालिकेच्या ‘मसुदा फी’मध्ये चार ते पंधरापट वाढ ! जाणून घ्या कोणा-कोणाला बसणार फटका

पुणे – Pune Municipal Corporation (PMC) | महापालिकेच्या दैनंदीन कामांतील सर्व प्रकाराच्या दस्तऐवजांचे मसुदे व अंतिम दस्ताऐवजांची (Final Document) फी तब्बल ३० वर्षांनी वाढविली आहे (PMC Draft Fee Hike). विविध प्रकाराच्या मसुदे व दस्ताऐवजांची फी अगदी चार पटीपासून १५ पटीपर्यंत वाढविली (PMC Draft Fee Increase) असल्याने याचा भार अगदी महापालिका कर्मचारी (PMC Employees), ठेकेदार (PMC Contractor) , भाडेकरू (PMC Tenant) आदींवर पडणार आहे. दरम्यान यामुळे महापालिकेला Pune Municipal Corporation (PMC) सुमारे एक कोटी रुपये उत्पन्न मिळणार आहे. (Four to fifteen times increase in Pune Municipal Corporation’s draft fee)
महापालिकेच्यावतीने विविध प्रकारचे ऍफिडेव्हीट (Affidavit), ठेकेदारांसोबत करारनामे (Agreement With PMC Contractor),
महापालिकेच्या मिळकती भाड्याने देतानाचे करारनामे (PMC Rental Agreement), कर्मचार्यांकडून नोकरीच्या प्रथम
नेमणुकीच्या वेळी घेतले जाणारे करारनामे, भूसंपादन (Land Acquisition), मुखत्यार पत्र (Power Of Attorney),
गहाणखत (Mortgage), सेवकांच्या वाहन कर्जाबाबत कर्जरोख्याचा दस्ताऐवज, अंडरटेकींड, मिळकतीवरील हक्क सोडून
देण्यासाठीचा दस्ताऐवज अशा विविध व्यवहारांसाठी करार केले जातात. यासाठी करावयाचे सर्व प्रकारचे दस्तऐवजांचे मसुदे
व अंतिम दस्ताऐवज हे महापालिकेकडून तयार करून घेतले जातात. हे दस्ताऐवज करण्यासाठी मसुदा फि आकारली जाते.
महापालिका आतापर्यंत मागील ३० वर्षांपुर्वी अर्थात २७ सप्टेंबर १९९१ मध्ये महापालिका आयुक्तांनी काढलेल्या परिपत्रकानुसार
मसुदा फी आकारणी करत होती. या फिमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव मार्च २०२१ मध्ये प्रशासनाने तयार केला होता.
यावर्षी मार्चमध्ये स्थायी समिती आणि नंतर सर्वसाधारण सभेने त्याला मान्यता दिली आहे.
यावरून नुकतेच महापालिका आयुक्तांनी (PMC Commissioner) या ठरावानुसार अंमलबजावणी
करण्याचे परिपत्रक जारी केले आहे. Pune Municipal Corporation (PMC)
– Pune Municipal Corporation (PMC)
या निर्णयानुसार यापुढे ऍफेडेव्हीट करण्याची मसुदा फी ५० रुपयांऐवजी २०० रुपये आकारली जाणार आहे.
कंत्राटदारांकडून लिहून घ्यायच्या करारनाम्यांची फि, मिळकत भाड्याने घेणे अथवा देणे, साठे खत व रस्ता रुंदीचा करारनामा
व ऍमिनिटी स्पेट करारनामा (PMC Amenity Spaces) मसुदा फी ३५० रुपयांवरून २५०० रुपये, नोकरीचा करारनामा
मसुदा फि ३५० वरून एक हजार रुपये, मुखत्यार पत्र मसुदा फि, दस्तऐवज रद्य करण्यासाठीची मसुदा फि १०० वरुने १५०० रुपये,
खरेदीखत मसुदा फी एक हजार वरून पाच हजार रुपये, गहाण खत एक हजार रुपयांवरून २ हजार रुपये,
मयत सेवकाचे वारसांना अदा करावयाच्या रकमेबाबतत लिहून घ्यावयाचा इंडेमनिटी बॉन्ड ५० रुपयांहून ५०० रुपये
तसेच १० हजार रुपयांपुढील रकमेसाठी १०० रुपयांऐवजी एक हजार रुपये मसुदा फी आकारण्यात येणार आहे.
सेवकांच्या वाहन कर्जासाठी पुर्वीच्या मसुदा फीमध्ये दहा पट वाढ करण्यात आली आहे. तसेच
वचनपुर्तीच्या मसुद्यासाठीच्या फीमध्ये २०० रुपयांवरून ५०० रुपये, लिव्ह ऍन्ड लायसेन्स दस्तऐवज
फी ३५० वरून २ हजार रुपये आणि मिळकतीवरील हक्क सोडून देण्यासाठी करावयाच्या दस्तऐवजासाठी
मसुदा फि १ हजार रुपयांवरून दीड हजार रुपये करण्यात आली आहे.
महापालिका दरवर्षी साधारण अडीच ते तीन हजार मसुदे करते. यातून दहा ते बारा लाख रुपये उत्पन्न मिळते.
मसुदा फी मध्ये वाढ केल्याने दरवर्षी 80 लाख ते एक कोटी रुपये उत्पन्न मिळेल, अशी माहिती मुख्य विधी
अधिकारी ऍड. निशा चव्हाण (PMC Chief Legal Officer Adv. Nisha Chavan) यांनी दिली.