Pune Municipal Corporation (PMC) | पुणे महापालिकेकडून कोंढवा खुर्द येथील अनधिकृत बांधकामांवर हातोडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महापालिकेकडून (Pune Municipal Corporation (PMC) झोन दोनमधील कोंढवा खुर्द येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत 1968 चौरस मीटर क्षेत्र मोकळे करण्यात आले. पुणे महापालिकेकडून (Pune Municipal Corporation (PMC) पुणे पेठ कोंढवा खुर्द येथील स.नं. 43, 46, 48 येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली.

 

अनधिकृत बांधकामांना 53 (1) नुसार नोटीस देण्यात आली होती. नोटीस दिल्यानंतर ज्यांनी अनधिकृत बांधकाम काढले नाही, त्यांच्यावर आज महापालिकेकडून कारवाई करण्यात आली. कोंढवा खुर्द येथील स. नं. 43 मधील माज शेख, अहमद शेख यांचे 100 चौ. मी., स.नं. 46 मधील इरफान मोमीन यांचे 200 चौ.मी. इम्रान शेख यांचे 1200 चौ. मी., स.नं. 48 मधील मुर्तजा शेख यांचे 180 चौ. मी, तौसिफ मौलाना यांचे 288 चौ. मी. असे एकूण 1968 चौ.मी. क्षेत्र मोकळे करण्यात आले. ही कारवाई पोलीस बंदोबस्तात 7 बिगारी सेवक, 2 गॅस कटर, 3 ब्रेकर व 2 जेसीबी यांच्या साह्याने करण्यात आली.

 

Web Title :- Pune Municipal Corporation (PMC) | Hammer on unauthorized constructions in Kondhwa Khurd by Pune Municipal Corporation

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MPSC | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निवड झालेल्या 111 उमेदवारांच्या नियुक्तीला उच्च न्यायालयाची स्थगिती

Solapur Crime | प्रेमसंबंधातून गर्भवती राहिलेल्या तरुणीची सोलापूरमध्ये आत्महत्या, पुण्यातील तरुणावर FIR

Pune Rickshaw Strike | रिक्षाचालकांच्या अडचणीत वाढ? रॅपिडोला अ‍ॅग्रिगेटर परवाना देण्यावर पुनर्विचार करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे पुणे आरटीओला आदेश