Pune Municipal Corporation (PMC) | थकबाकी भरा, अन्यथा कोठोर कारवाई; थकबाकी वसुलीसाठी पाणीपुरवठा विभागाकडून स्वतंत्र कार्यकारी अभियंत्याची नेमणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Municipal Corporation (PMC) | पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने (Water Supply Department) पुणे मनपा, पुणे छावणी परिषद (Pune Cantonment) व खडकी छावणी परिषद (Khadki Cantonment) क्षेत्रामधील ग्राहक, व्यवसायिक आस्थापना, शासकीय, निमशासकीय व केंद्र शासनासह पाणीपुरवठा मीटर विभागाच्या सर्व थकबाकीदारांना थकबाकी (Outstanding) भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच थकबाकी न भरणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) पाणीपुरवठा विभागाने दिला आहे.

 

थकबाकी वसुल करण्यासाठी पुणे महापालिकेच्या पाणीपुरठा विभागाने एक पाऊल पुढे टाकले आहे.
थकबाकी वसुलीसाठी पाणीपुरवठा खात्याने पुणे महानगरपालिकेसाठी स्वतंत्र कार्यकारी अभियंता (Executive Engineer)
यांची नेमणूक केली असून त्यांच्या नियंत्रणात स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे. पुढील 15 दिवसात थकबाकी न भरणाऱ्यांवर कठोर कारवाई (Strict Action)
करण्याचे संकेत मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर (Anirudh Pavaskar) यांनी दिले आहेत.

 

नागरिकांनी आपल्याकडे पाणी बिलाची थकबाकी असेल तर तात्काळ पुणे महानगरपालिकेच्या लष्कर पाणीपुरवठा विभाग,
स्वारगेट पाणीपुरवठा विभाग, एसएनडीटी पाणीपुरवठा विभाग येथे संपर्क साधून आपली थकबाकी तात्काळ भरून घ्यावी.
नागरीकांनी थकबाकी जाणून घेण्यासाठी ८८८८२५१००१ या व्हाट्सअप क्रमांकावर मेसेज द्वारे संपर्क साधावा असे
आवाहन पुणे महानगरपालिकेने केले आहे

 

Web Title :- Pune Municipal Corporation (PMC) | Pay the arrears, otherwise strict action; Appointment of Independent Executive Engineer by Water Supply Department for recovery of arrears

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune ACB Trap | अनुकूल अहवाल देण्यासाठी ४० हजारांची लाच घेणारा विधी सल्लागारासह दोघांना अटक; अशा प्रकारची पहिलीच कारवाई

Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election | कसबा व चिंचवडमध्ये मनसेचा भाजपला पाठिंबा, महाविकास आघाडीचे टेन्शन वाढलं?

Keshav Upadhye | ताई, महाराष्ट्रातील सोसायट्या, कारखाने कुणी चाटून पुसून खाल्ले? भाजपचा सुप्रिया सुळेंना खोचक सवाल