Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही; आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

पुणे – पोलीसनामा ऑनलाइन  Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा सुरु (Monsoon) होण्यास काही दिवस शिल्लक राहीले असले तरी पावसाळी कामांना गती मिळालेली नाही. यातील बहुतेक कामे निम्मीसुद्धा पूर्ण झाली नसुन, रस्त्यांच्या कामाच्या निवीदासुद्ध अद्याप काढण्यात आलेल्या नाहीत. तर महापालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी पावसाळापूर्व कामांची जबाबदारी तीनही अतिरिक्त आयुक्तांवर निश्‍चित केली असून १५ जुनपर्यंत सर्व कामे पुर्ण केली जातील असा विश्वास व्यक्त केला आहे. (Pune Municipal Corporation (PMC) )

दरवर्षी पावसाळ्यापूर्वी महापालिकेकडून शहरातील ओढे, नाले, पावसाळी गटारे, ड्रेनेज लाईन, चेंबर आदींची साफसफाई आणि राडारोडा उचलण्याची कामे केली जातात. तसेच रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी डांबरीकरण केले जाते. ही कामे दरवर्षी एप्रिलमध्ये सरू करून पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले जाते. मात्र, दरवर्षी ही कामे करण्यासाठी ठेकेदार कमी दराने निवीदा भरतात, आणि त्या मंजूरही होतात. कामे झाल्यानंतर त्याची कामाची बिले निघतात. मात्र, लहान लहान पावसामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरते, चेंबर तुंबतात, रस्त्यावर पाणी साचले. यामुळे पावसाळी कामे होण्यावर संशय व्यक्त केला जातो. काम न करताच नगरसेवक, अधिकारी आणि ठेकेदार हे संगनमताने बिले काढतात, अशी टीका दरवर्षी होते. यंदा प्रशासक असल्याने ही कामे वेळेत पुर्ण होतील असे वाटत होते, परंतु दरवर्षी प्रमाणे या कामांचे ये रे माझ्या मागल्या सारखे झाले आहे. (Pune Municipal Corporation (PMC) )

महापालिकेच्या जुन्या आणि नव्या हद्दीत नाले आणि उपनाल्यांची एकुण लांबी ६४७ किमी आहे, त्यावर एकुण ७४२ कल्व्हर्ट आणि बारा बंधारे आहेत. त्यापैकी ९७ किमी लांबीचे नाले आणि कल्वर्ट पैकी २२१ ची सफाई झाली आहे.

शहरात एकुण ३२५ कि.मी. लांबीच्या पावसाळी लाईन्स असून त्यावर ५५ हजार ३०० पावसाळी चेंबर्स आहेत.
त्यापैकी १०२ किमी लांबीच्या पावसाळी लाईन आणि २२ हजार ९५४ चेंबरची साफसफाई झाली आहे.
पावसाळी कामे वेगाने पुर्ण करण्यासाठी तीन अतिरीक्त आयुक्तांकडे झोन निहाय जबाबदारी दिली आहे.
ही कामे १५ जुनपर्यंत पुर्ण करण्यात येतील.
पुराचा धोका असणार्‍या ठिकाणांची कामे करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. ही कामे वेळेत पुर्ण होतील.

– विक्रम कुमार, प्रशासक आणि आयुक्त (PMC Commissioner and Administrator Vikram Kumar )

 

Web Title :- Pune Municipal Corporation (PMC) | Pre-monsoon works are not yet in full swing; Responsibilities assigned by the Commissioner to all three Additional Commissioners

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा