Pune Municipal Corporation (PMC) | अतिक्रमण कारवाई करताना ‘पंचनामा’ करणे शक्य नाही ! पालिकेच्या गोदामात चोर्‍या होतात परंतू…

व्यावसायिकच तक्रार करत नसल्याने गुन्हे दाखल होत नाहीत - माधव जगताप (अतिक्रमण विभाग प्रमुख, पुणे महापालिका)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Municipal Corporation (PMC) | जप्तीची कारवाई करताना (PMC Encroachment Drive) पंचनामा करणे शक्य नाही (Panchnama Is Not Possible During PMC Encroachment Drive). जप्त केलेले साहित्य ज्या गोदामांमध्ये ठेवले जाते तेथे चोर्‍या होतात तसेच सुरक्षा रक्षकांनाही मारहाण होते. मात्र, ज्या व्यासायीकांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे, त्यांच्याकडून तक्रार केली जात नसल्याने पोलिसांत गुन्हा (Pune Crime) दाखल करता येत नाही, असा दावा महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे (PMC Encroachment Department) प्रमुख उपायुक्त माधव जगताप (PMC Madhav Jagtap) यांनी केला आहे. दरम्यान, अतिक्रमण कारवाईमध्ये जप्त केलेले साहित्य ठेवण्यासाठीची १३ गोदामे फुल्ल झाली असून नवीन गोदामांसाठी मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडे मागणी केल्याचेही जगताप यांनी नमूद केले. Pune Municipal Corporation (PMC)

 

पुणे महापालिका तसेच फक्त आणि फक्त पुण्यातील राजकारणाच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

सध्या महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्यावतीने पथारी, हातगाडीवाले यांच्याविरुद्ध जोरदार कारवाई केली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा दाखला घेत अतिक्रमण विभागाने रात्री देखील कारवाई सुरु ठेवली आहे. निकालानुसार पथारी व्यावसायिक, हातगाडीधारकांना रस्त्यावर कोणताही माल, गाडी, खुुर्च्या, टेबल आदी ठेवता येणार नाही. त्यांनी रस्ता आणि पदपथ मोकळे करून देणे आवश्यक आहे. त्यामुळे ही कारवाई केली जात असल्याचा दावा अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी केला आहे. Pune Municipal Corporation (PMC)

 

– पंचनामा करणे अशक्य
अतिक्रमण कारवाई करताना, जप्त केलेल्या मालाची किंवा वस्तुंचा पंचनामा केला जातो का ? असे जगताप यांना विचारले असता, त्यांनी सदर कारवाई करताना पंचनामा करणे शक्यच नसल्याचे नमूद केले. कारवाई करताना होणारा विरोध लक्षात घेता, तेथे पंचनामा करताच येणार नाही असेही त्यांनी नमूद केले. यासाठी कारवाईच्यावेळी व्हिडीओ शुटींग केली जाते. जप्त केलेल्या हातगाडी, स्टॉल दंड भरून पुन्हा काही जण नेतात. परंतु पंचनामा न केल्याने तो जप्त माल पुन्हा परत देण्यात काही अडचण येत नाही का असे विचारले असता, जगताप म्हणाले, व्यावसायिक त्याची गाडी, स्टॉल हे ओळखतो. परंतु यातूनही मार्ग काढण्यासाठी आम्ही टॅगींग लावण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तो फारसा यशस्वी ठरला नाही.

– जागा अपुरी पडू लागली
अतिक्रमण विभागाने जप्त केलेली वाहने, हातगाडी, स्टॉल, टेबल, खुर्च्या, पत्रे आदी ठेवण्यासाठी चौदा खुली गोदामे आहे. सध्या सुरु असलेल्या अतिक्रमण विरोधी कारवाईमुळे या जागा भरल्या आहेत. यामुळे महापालिकेच्या मालकीच्या दोन जागा मालमत्ता विभागाकडून मागण्यात आल्या आहेत. याजागा कमीत कमी एक एकर क्षेत्राच्या असल्या तरच तेथे जप्त केलेला माल ठेवणे शक्य होते.

 

– सीसीटीव्ही बसविले
जप्त करुन ठेवलेल्या मालाची चोरी होण्याचे प्रकार घडत आहे. तीन वर्षांपुर्वी हडपसर येथे ठेवण्यात आलेल्या हातगाड्या, स्टॉल आदी आगीच्या भक्षस्थानी पडले होते. तसेच नगर रोड भागातही तेथील सुरक्षा रक्षकांना मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. यामुळे गोदामाच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार दहा ठिकाणी सीसीटिव्ही बसविण्यात आले आहेत.

 

कारवाईतील हातगाडी सोडण्यासाठी महापालिकेकडून ५ हजार रुपये तर स्टॉलसाठी १० हजार रुपये दंड आकारला जातो.

 

Web Title :- Pune Municipal Corporation (PMC) | Punchnama cannot be done while taking encroachment action! There are thieves in the warehouse of the municipality but …

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune MHADA | पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! म्हाडा तब्बल 1200 सदनिकांची सोडत काढणार

 

Pune Crime | दरोड्याच्या तयारीत असलेली सराईत गुन्हेगारांची टोळी गुन्हे शाखेकडून गजाआड ! एअरगन पिस्टल, कोयता जप्त

 

Sanjay Raut On Underworld | संजय राऊतांनी सांगितलं, हनुमान चालिसा, भोंगे प्रकरणांशी अंडरवर्ल्डचं कनेक्शन; म्हणाले…