Pune Municipal Corporation (PMC) | पुणे मनपाचे प्रशासक विक्रम कुमारांचा माजी नगरसेवकांना आणखी एक धक्का; म्हणाले – ‘आर्थिक वर्षाच्या शेवटी केलेल्या ‘विकास’ कामांची तपासणी केल्यानंतरच बिले देणार’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Municipal Corporation (PMC) | आर्थिक वर्षाच्या शेवटी मंजुर झालेल्या आणि खासगी जागांत केल्या गेलेल्या कामांची तपासणी करण्यात येणार आहे. चुकीच्या पद्धतीने झालेल्या कामांची बिले काढली जाणार नाही अशी माहीती महापालिकेचे प्रशासक विक्रम कुमार (PMC Administrator and Commissioner Vikram Kumar) यांनी दिली. अतिक्रमण विरोधात कारवाई (PMC Action Against Encroachment) , जागांच्या वापराची पडताळणी पाठोपाठ आता प्रशासकांनी माजी नगरसेवकांना (PMC Corporators) आणखी एक धक्का दिला आहे. (Pune Municipal Corporation (PMC))

 

आर्थिक वर्ष संपण्यापुर्वी प्रभागातील कामे मार्गी (PMC Development Works) लावण्यासाठी नगरसेवकांची धावपळ उडाली होती. कामांच्या निविदा काढणे, त्याला मंजुरी मिळविणे, प्रत्यक्षात काम सुरु करण्याचे आदेश काढेपर्यंत नगरसेवकांनी प्रयत्न सुरु ठेवले होते. प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी न केलेल्या कामांची बिले (Tenders Bill) काढण्याचा प्रकार यापुर्वी झालेला आहे, त्याचप्रमाणे यावर्षी महापालिकेची निवडणुक (PMC Elections) होणार असल्याने काही माननीयांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी खासगी जागेतही महापालिकेचा निधी (PMC Funds) खर्ची केला आहे. यासंदर्भात पत्रकारांनी विचारले असता, प्रशासक विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) म्हणाले, महापालिकेच्या कामांची तपासणी करण्यात येणार आहे. पंचवीस टक्के कामांची तपासणी ही क्षेत्रीय कार्यालयांना करण्यास सांगितले आहे. त्यानंतर अतिरीक्त आयुक्त हे देखील काही कामांची तपासणी करणार असुन, मी स्वत: देखील काही ठिकाणी अचानक भेट देऊन कामांची तपासणी करणार आहे. यामध्ये चुकीच्या पद्धतीने झालेल्या कामांची बिले काढली जाणार नाही. Pune Municipal Corporation (PMC)

 

PMPML च्या ताफ्यातील डिझेल बसेसची जागा घेणार ई बसेस

शहरातील वायु प्रदुषण कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेकरीता केंद्र सरकारकडून (Central Government) दिल्या जाणार्‍या निधीतून दोनशे ई बसेस (PMPML e Bus) खरेदी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. याबाबतची निविदा प्रक्रीया लवकरच राबविली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते सुमारे १४० बसेसचे नुकतेच लोकार्पण झाले आहे. त्या टप्प्यातील आणखी ५० बसेस पीएमपीच्या ताफ्यात या महीनाखेरीला दाखल होतील. पुणे महापालिकेप्रमाणेच पिंपरी चिंचवड महापालिका Pimpri Chinchwad Municipal corporation (PCMC) शंभर ई बसेस घेणार आहे.
यामुळे पीएमपीच्या ताफ्यात सुमारे तीनशे बसेस दाखल होतील.
सध्या पीएमपीकडे डिझेलवर धावणार्‍या केवळ साडे तीनशे बसेस असुन,
या बसेसही टप्प्या टप्प्याने सेवेतून बाद केल्या जाणार आहे अशी माहीती विक्रम कुमार यांनी दिली.

 

Web Title :- Pune Municipal Corporation (PMC) | Pune Municipal Corporation Administrator and Commissioner Vikram Kumar gave another blow to the former corporators, saying, “I will pay the bills only after inspecting the ‘development’ work done at the end of the financial year

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा