Pune Municipal Corporation (PMC) | पुणे महापालिकेचे 34 पैकी 16 जलतरण तलाव (PMC Swimming Pool) सुरू ! थकबाकी असणाऱ्या तलावांना सील करणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महापालिकेच्या Pune Municipal Corporation (PMC) वतीने पुणे शहरामध्ये 34 जलतरण तलाव (PMC Swimming Pool) बांधण्यात आले आहेत. मात्र यापैकी केवळ 16 जलतरण तलाव सुरु आहेत. ज्या जलतरण तलावाकडे महापालिकेची थकबाकी (Outstanding) आहे असे जलतरण तलाव सील करण्याचे काम पालिकेकडून Pune Municipal Corporation (PMC) सुरु करण्यात आले आहेत. तसेच काही जलतरण तलाव चालवण्यासाठी देण्यात येणार असून त्यासाठी निविदा प्रक्रिया (Tender Process) सुरु करण्यात आली आहे. कोरोना महामारीच्या (Corona Epidemic) काळातील तब्बल 2 कोटी 61 लाख रुपये भाडे माफ करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने ठेवला आहे.

 

पुणे महापालिकेने Pune Municipal Corporation (PMC) शहराच्या वेगवेगळ्या भागात नागरिकांना जलतरणाची सुविधा करुन देण्यासाठी जलतरण तलाव बांधले आहेत. हे जलतरण तलाव पालिकेकडून निविदा प्रक्रिया राबवून चालवण्यासाठी दिले जातात. चालवण्यास दिलेल्या तलावाचे मागील 6 ते 7 वर्षापासून 3 कोटीहून अधिक रुपयांचे भाडे थकले आहे. त्यामुळे महापालिकेच्या क्रीडा विभागाने (PMC Sports Department) थकबाकी थकवलेल्या जलतरण तलावावर कारवाई सुरु केली आहे.

 

थकबाकी असलेल्या जलतरण तलावांना नोटीस पाठवण्यात आली. तर काही तलाव हे सील करण्यात आले आहे. पालिकेने सील केलेल्या तलावामध्ये शुक्रवार पेठेतील प्रमोद महाजन जलतरण तलाव (Pramod Mahajan Swimming Pool), वडगाव येथील सुलोचना कुदळे जलतरण तलाव (Sulochana Kudale Swimming Pool Wadgaon), येरवडा येथील नानासाहेब परुळेकर जलतरण तलाव (Nanasaheb Parulekar Swimming Pool Yerawada), शिवाजीनगर येथील जलतरण तलाव, सिंहगड रस्ता येथील रमेश वांजळे जलतरण तलाव (Ramesh Wanjale Swimming Pool Sinhagad Road), वारजे येथील बारटक्के जलतरण तलाव (Baratakke Swimming Pool Warje Malwadi), धनकवडी येथील आप्पासाहेब जगताप जलतरण तलाव (Appasaheb Jagtap Swimming Pool Dhankawadi) यांचा समावेश आहे. बालगंधर्व रंग मंदिराशेजारी (Balgandharva Rang Mandir) नांदे तलावही (Nande Swimming Pool) थकबाकीमुळे सील केला गेला होता. संबंधित ठेकेदाराने थकबाकी भरल्याने तो पुन्हा सुरु करण्यास परवानगी दिली गेली आहे.

महापालिकेने उभारलेल्या जलतरण तलावापैकी निम्मे बंद आहेत. याबाबत अतिरिक्त आयुक्त ज्ञनेश्वर मोळक (Additional Commissioner Dnyaneshwar Molak) आणि क्रिडा विभागाचे प्रमुख संतोष वारुळे (Santosh Warule) यांनी सांगितले, या जलतरण तलावांचे देखभाल दुरुस्तीची कामे करावी लागणार आहेत.
त्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. काही तलाव हे ठेकेदाराकडून चालवण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली जात आहे.
लवकरच आणखी जलतरण तलाव नागरिकांसाठी खुले करण्यात येतील.
काही ठेकेदारांनी स्वत: खर्च करण्याची तयारी दाखवली आहे. त्याचा खर्च भाड्यातून वगळला जाणार आहे.
याबाबत प्रशासनासोबत चर्चा झाली आहे.

 

कोरोना कालावधीतील भाडे माफ करा
कोरोना काळात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे (Lockdown In Maharashtra) जलतरण तलाव बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते.
त्यामुळे पुण्यातील जलतरण तलाव बंद ठेवण्यात आले होते.
या कालावधीतील म्हणजे 17 महिन्याचे 2 कोटी 61 लाख एवढे भाडे माफ करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने केला आहे.
त्याला अंतिम मंजुरी देण्यासाठी तो ठेवण्यात आला आहे.

 

Web Title :- Pune Municipal Corporation (PMC) | Pune Municipal Corporation launches 16 out of 34 swimming pools (PMC Swimming Pool) PMC Will seal Arrears swimming pools

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा