पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महापालिकेच्या Pune Municipal Corporation (PMC) आकाशचिन्ह विभागाकडून (PMC Sky Sign and License Department) विनापरवाना जाहिरात (Advertising), नामफलकांवर (Nameplate) कारवाई करण्यात येत आहे. मार्च महिन्यात पुणे महापालिकेच्या Pune Municipal Corporation (PMC) आकाशचिन्ह विभागाने 38 हजार 354 जाहिरात, नामफलक, फ्लेक्स, बॅनर यांच्यावर कारवाई करुन 1 लाख 99 हजार रुपयांचे शुल्क वसुल केले आसल्याची माहिती आकाशचिन्ह विभागाने दिली आहे.
पुणे महापालिकेच्या Pune Municipal Corporation (PMC) हद्दीमध्ये जाहिरात फलक, नामफलक लावण्यासाठी परवाना व आकाशचिन्ह विभागाकडून परवानगी दिली जाते. पालिकेच्या हद्दीमध्ये खाजगी मालकीच्या, भाडेपट्ट्याच्या जागेवर व्यावसायिकांना त्यांची दुकाने, अस्थापना, दुकानाची लांबी व 3 फूट रुंदी अशा आकारमानाचा एक नामफलक विना शुल्क (Free of Charge) लावण्यास परवानगी आहे. याव्यतिरीक्त फलक लावायचे असल्यास संबंधितांना परिमंडळ 1 ते 5 यांची रितसर परवानगी घ्यावी लागते. मात्र, पुणे महापालिकेच्या हद्दीमध्ये अनेक ठिकाणी विना परवाना जाहिरात, नामफलक लावण्यात आले आहेत.
—
विना परवाना लावण्यात आलेल्या सर्व जाहिरात फलक, नामफलकांवर पुणे महापालिकेकडून कारवाई करण्यात येत आहे. मार्च 2022 या महिन्यामध्ये पालिकेने 6 जाहिरात फलक, 8923 बोर्ड, 5136 बॅनर, 4331 फ्लेक्स, 3314 झेंडे, 9188 पोस्टर, 4227 किऑक्स, 2901 इतर, 328 नामफलक असे एकूण 38 हजार 354 निष्कासन कारवाई करण्यात आली आहे. तसेच संबंधितांकडून 1 लाख 99 हजार रुपयांचे शुल्क वसुल करण्यात आले आहे.
शहरातील व्यावसायिकांनी नामफलक लावण्याकरता संबंधित विभागाची पूर्व परवानगी घेऊन नामफलक लावावेत.
अन्यथा पालिकेकडून विना परवाना नामफलकांवर कारवाई करण्यात येईल.
तसेच कारावाईचा खर्च, दंड संबंधित व्यावसायिकाकडून वसुल केला जाईल असे आकाशचिन्ह विभागाकडून सांगण्यात आले आहे.
Web Title :- Pune Municipal Corporation (PMC) | Pune Municipal Corporation takes action against unlicensed advertisements charges Rs 2 lakh
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update