Pune Municipal Corporation (PMC) | पुणे महापालिका 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या वापरणार्‍यांवरील कारवाईला गती देणार  

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Municipal Corporation (PMC) | येत्या 1 जुलैपासून देशभरामध्ये होणार्‍या ‘प्लास्टिक’ पिशव्या बंदीची (Plastic Bags Banned) कडक अंमलबजावणी करण्यासाठी पुणे महापालिका (Pune Municipal Corporation (PMC) सरसावली आहे. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य निरीक्षकांना प्लास्टिक बंदीची काटेकोर अंमलबजावणी करतानाच 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणार्‍यांवर गुन्हे (FIR) दाखल करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

 

राज्यात यापुर्वीच 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांना बंदी घालण्यात आली आहे. यानंतरही या पिशव्यांचा वापर होत असल्याचे निदर्शनास आल्यास अगोदर दंडात्मक कारवाई आणि पुनरावृत्ती झाल्यास संबधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहे. परंतु या कारवाईमध्ये सातत्य नसल्याचे पाहायला मिळत असून बाजारपेठेत 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर होत असल्याचे दिसून येत आहे. अशातच केंद्र सरकारनेच (Central Government) संपूर्ण देशभरामध्ये 1 जुलैपासून प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदीची घोषणा केली आहे. त्यामुळे प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावरील कारवाईला पुन्हा गती मिळण्याची शक्यता आहे.

 

शहरातील प्लास्टिक पिशव्यांवरील बंदीच्या अंमलबजावणीबाबत बोलताना महापालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) घनकचरा व्यवस्थापन प्रमुख आशा राउत (Deputy Commissioner Asha Raut) म्हणाल्या, की राज्य शासनाच्या (State Government) आदेशानुसार 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवरील बंदीची अंमलबजावणी करण्यात येत आहे. क्षेत्रिय कार्यालय स्तरावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी व आरोग्य निरीक्षकांमार्फत संयुक्त कारवाई करण्यात येते. दररोज 20 ते 25 किलो प्लास्टिकच्या पिशव्या जप्त करण्यात येत आहे. प्रशासनाने यापूर्वी देखील शहरात 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांची निर्मिती करणारे उद्योग आणि विक्रेत्यांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून शेकडो किलो प्लास्टिक पिशव्या जप्तही करण्यात आल्या आहेत.

पर्यावरणाला मारक असलेल्या प्लास्टिकचा वापर कमी व्हावा यासाठी महापालिकेकडून सातत्याने जनजागृती करण्यात येते. नुकतेच पालखी सोहळ्यामध्ये देखिल प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळावा यासाठी व्यापक जनजागृती करण्यात आली. एकदा कारवाई केल्यानंतर पुनरावृत्ती करणार्‍या विक्रेत्यांवर थेट गुन्हे दाखल करावेत, असे आदेशही अधिकार्‍यांना देण्यात आल्याचे राउत यांनी नमूद केले.

 

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी
पर्यावरण पूरक गणेशोत्सवासाठी (Ganeshotsav) यंदा प्लास्टर ऑफ पॅरीसच्या (Plaster of Paris) मुर्तींवर बंद घालण्यात आली आहे.
मुर्तीकारांनी प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर टाळावा, असे आवाहन सातत्याने करण्यात येत आहे.
यासंदर्भात गणेश मूर्ती विक्रेत्यांनाही बाहेरील जिल्ह्यातून अथवा राज्यातून प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मुर्ती विक्रीसाठी ठेवू नये,
असे आवाहन करण्यात आले आहे. घरच्या घरी गणेश विसर्जन अथवा मुर्तीदानाला प्राधान्य देण्याबाबत पुणेकरांचा प्रतिसाद वाढत आहे.
यंदाही नागरिकांनी नैसर्गिक प्रवाहात अर्थात नदी, कालवा, तलाव आणि विहीरीमध्ये मुर्तींचे विसर्जन करू नये.
त्याऐवजी घरच्या घरी मुर्ती विसर्जन अथवा मूर्तीदान करावे असे आवाहन आहे.
घरच्या घरी मुर्ती विसर्जनासाठी महापालिका गेले काही वर्षे नागरिकांना अमोनियम बाय कार्बोनेट मोफत उपलब्ध करून देत आहे.
महापालिकेकडे अमोनियम बाय कार्बोनेटचा पुरेसा साठा असल्याने यंदा खरेदी केली जाणार नाही
अशी माहिती घनकचरा विभागाच्या उपायुक्त आशा राउत यांनी दिली.

 

Web Title :- Pune Municipal Corporation (PMC) | Pune Municipal Corporation will expedite the action against those who use plastic bags less than 50 microns in thickness

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rupali Patil Thombare | …. तर तुमचं घराबाहेर पडणं बंद करु, रुपाली पाटील ठोंबरे यांचा राणेंना इशारा

 

MPSC | राज्यसेवेच्या मुख्य परीक्षा पद्धतीत बदल; MPSC चा मोठा निर्णय

 

Nitin Gadkari | आता भारतात होणार गाड्यांची क्रॅश टेस्ट, Bharat NCAP ला मंजुरी