Pune Municipal Corporation (PMC) | पुणे महापालिकेचा मोठा निर्णय, तृतीयपंथी व्यक्तींना कंत्राटी सेवक म्हणून घेणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Municipal Corporation (PMC) | समाजातील दुर्लक्षित असलेल्या तृतीयपंथी घटकाला स्वाभिमानी आणि स्वावलंबी बनविण्यासाठी पुणे महानगरपालिकेने पुरोगामी पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. तृतीयपंथी व्यक्तींना (Transgender) मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पुणे महापालिकेने मिळकतीच्या संरक्षणासाठी प्रायोगिक तत्वावर 25 तृतीयपंथी व्यक्तींना तातडीने ठेकेदारामार्फत कामावर रुजू करून घेण्यास व उर्वरितांना टप्प्याटप्याने कामावर घेण्यास मान्यता दिली आहे. महापालिकेचे (Pune Municipal Corporation (PMC) आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार (Administrator Vikram Kumar) आणि अतिरिक्त आयुक्त (इस्टेट) कुणाल खेमनार (Kunal Khemnar) यांनी मान्यता दिली आहे.
पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) कमला नेहरु हॉस्पिटल (Kamala Nehru Hospital), राजीव गांधी प्राणीसंग्रहालय (Rajiv Gandhi Zoo), मनपा भवन (Municipal Bhavan) तसेच अनधिकृत बांधकाम निर्मुलन व अतिक्रमण विभागाच्या कारवाई करता या तृतीयपंथी व्यक्तींची नेमणूक केली जाणार आहे. सध्या कार्यरत असलेल्या सैनिक सेक्युरिटी प्रा. लि. (Sainik Security Pvt. Ltd.) व इगल सेक्युरिटी प्रा. लि. (Eagle Security Pvt. Ltd.) या खासगी कंपनीकडून वेतन तसेच सरकारी देय देणे दिले जाणार आहे.
या कामाचा प्रस्ताव उपायुक्त सुरक्षा विभाग माधव जगताप (Madhav Jagtap) यांनी तयार करुन सदार केला होता. तसेच यासाठी शहरातील तृतीयपंथी वर्गासाठी काम करणाऱ्या सेवाभावी संस्थेची कमिटी तयार करुन मनपा कर्मचारी अधिकारी व तृतीयपंथी कामगार यांच्यात सामाजिक स्नेह रहावा यासाठी जनजागृती केली जाणार आहे.
भविष्यात तृतीयपंथी व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांच्याकरिता लोकाभिमुख उपक्रम
राबविण्याचा संकल्प असून त्यानुसार कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.
पुणे महानगरपालिकेचा उपक्रम समाजातील प्रत्येक घटकास न्याय देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
Web Title : Pune Municipal Corporation (PMC) | Pune Municipal Corporation’s big decision is to hire transgender as contract servants
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- Maharashtra Politics News | ठाकरे गटाला पाहिजेत लोकसभेच्या इतक्या जागा, मविआच्या बैठकीतील महत्त्वाची बातमी लिक!
- MP Udayanraje Bhosale | ‘विश्वासघाताची आमची परंपरा नाही’, उदयनराजेंचा शरद पवारांना टोला
- Narayan Rane | ‘या एक आमदार वाल्यानं…’, नारायण राणेंचा राज ठाकरेंना टोला (व्हिडिओ)
- Pune PMC News | पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकावर हातगाडी व्यावसायीकांचा हल्ला; कामगार युनियनच्या वतीने उद्या काम बंद ठेवून धरणे आंदोलन
- MP Dr. Amol Kolhe | पुणे जिल्ह्याची विभागणी व नवीन शिवनेरी नावावर खा. अमोल कोल्हे स्पष्टच बोलले !