Pune Municipal Corporation (PMC) | महापालिकेच्या सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचार्‍यांना सहकार्‍यांकडूनच दुय्यम वागणूक सातव्या वेतन आयोगानुसार पेन्शन निश्‍चितीकरणच केले नसल्याने निवृत्त अधिकारी व कर्मचार्‍यांमध्ये रोष

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Municipal Corporation (PMC) | महापालिका अधिकारी व कर्मचार्‍यांना (PMC Officers And Worker) सातव्या वेतन (7th Pay Commission) आयोगानुसार वेतन देण्यास सुरूवात झाली असून फरकाच्या रकमेचा हप्ताही मागील महिन्यांत देण्यात आला आहे. परंतू विविध विभागांच्या चाल ढकलीमुळे सेवानिवृत्त पेन्शनधारकांना (PMC Pensioners) अद्याप सातव्या वेतन आयोगानुसार पेन्शन मिळत नसल्याचे समोर आले आहे. मुख्य लेखा व वित्त अधिकार्‍यांनी याची गंभीर दखल घेतली असून ३१ मे पर्यंत सातव्या वेतन आयोगानुसार निवृत्ती वेतन निश्‍चितीकरण करून अहवाल न पाठविल्यास संबधित बिल क्लार्क आणि पेन्शन लेखनिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. Pune Municipal Corporation (PMC)

 

महापालिकेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांना मागील दोन महिन्यांपासून सातव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी लागू करण्यात आली आहे. त्यानुसार त्यांना वेतनही अदा करण्यात येत असून मागील महिन्यांत फरकाचा पहिला हप्ताही देण्यात आला आहे. आजमितीला महापालिकेचे सुमारे १८ हजार अधिकारी व कर्मचारी आहेत. मात्र, वेतन आयोग स्वीकारल्यानंतर अर्थात १ जानेवारी २०१६ नंतर निवृत्त झालेले अधिकारी व कर्मचार्‍यांना अद्याप सातव्या वेतन आयोगानुसार पेन्शन दिली जात नसल्याचे समोर आले आहे. Pune Municipal Corporation (PMC)

महापालिकेचे विविध विभाग व क्षेत्रिय कार्यालयांना सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचार्‍यांचे सातव्या वेतन आयोगानुसार
वेतन निश्‍चित करून प्रकरण मुख्य लेखा व वित्त अधिकार्‍यांकडे पाठविण्याचे आदेश डिसेंबर २०१२ मध्येच देण्यात आले आहेत.
परंतू यानंतरही अनेक विभाग व क्षेत्रिय कार्यालयांकडील बिल क्लार्क आणि लेखनिकांनी याची पूर्तता केलेली नाही.
यामुळे निवृत्त कर्मचार्‍यांना आजही जुन्याच दराने पेन्शन मिळत आहे.
याबाबत निवृत्त कर्मचारी आणि कामगार संघटनांकडून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे.
या पार्श्‍वभूमीवर मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर यांनी महापालिकेचे सर्व विभाग आणि क्षेत्रिय कार्यालयांना स्मरणपत्र पाठवून ३१ मे पर्यंत पेन्शन निश्‍चितीकरण करून वेतन आयोग कमिटी कडून तपासणी करून त्यांच्या मान्यतेसह सेवा पुस्तकांसह प्रकरणे मुख्य लेखा व वित्त विभागाकडे पाठवावीत.
विहीत मुदतीत ही प्रकरणे न आल्यास संबधित बिल क्लार्क आणि लेखनिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
तसेच विलंब झाल्यास सेवानिवृत्तांच्या रोषास अथवा आंदोलनास संबधित खातेप्रमुख जबाबदार राहातील,
असा खरमरीत इशाराही दिला आहे.

 

Web Title :- Pune Municipal Corporation (PMC) | Secondary treatment of retired officers and employees of PMC by their colleagues only Anger among retired officers and employees over non-confirmation of pension as per 7th pay commission

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | जास्तीचा नफा मिळवणं पडलं चांगलंच महागात, 21 लाखांना गंडा, ऑनलाइन फसवणुक करणाऱ्या दोघांवर FIR!

 

Anti Corruption Bureau (ACB) Latur | गुन्ह्यातील मुख्य आरोपीकडून लाच घेणारा पोलीस हवालदारच अडकला लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात!

 

Vaani Kapoor Killer Look | कॅज्युअल लुकमध्ये दिसली वाणी कपूर, पैपराझी समोर दिल्या किलर पोज..