Pune Municipal Corporation (PMC) | पुणे महापालिकेची मुख्य सभा आणि स्थायी समितीसह विषय समित्यांचेही कामकाज होणार; पण…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महापालिकेतील Pune Municipal Corporation (PMC) नगरसेवकांचा कार्यकाळ संपुष्टात (PMC Corporator Term End) येउन १५ मार्चपासून महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांचीच प्रशासक (PMC Administrator) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. परंतू यानंतरही महापालिकेतील Pune Municipal Corporation (PMC) स्थायी समितीसह (PMC Standing Committee) सर्वच विषय समित्यांचे कामकाज सुरू राहणार आहे. फरक एवढाच की खातेप्रमुखांकडून या विषय समित्यांपुढे येणार्‍या प्रस्तावांवर ‘प्रशासक’च अंतिम निर्णय घेणार आहेत.

 

सार्वत्रिक निवडणूक लांबणीवर पडल्याने पुणे महापालिकेवर १५ मार्चपासून महापालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांचीच प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे (PMC Administrator Vikram Kumar).
महापालिका सभागृह अस्तित्वात असताना प्रत्येक खातेप्रमुख आणि नगरसेवकांकडून येणारे प्रस्ताव स्थायी समिती, शहर सुधारणा समिती, विधी समिती, महिला व बाल कल्याण समिती, क्रीडा समिती, नाव समिती, शिक्षण समिती पुढे मान्यतेसाठी येत असत.
यापैकी काही धोरणात्मक निर्णयांचे प्रस्ताव पुढे सर्वसाधारण सभेपुढे अंतिम मान्यतेसाठी ठेवण्यात येतात.
परंतू प्रशासक नेमल्यानंतर कामकाज कशा पद्धतीने चालणार याबाबत अनेकांच्या मनात कुतुहल निर्माण झाले होते.
प्रशासक या नात्याने महापालिका आयुक्तांनी नागरिकांशी संबधित दैनंदीन कामकाजाबाबत सर्व खातेप्रमुख, उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्तांच्या जबाबदार्‍या निश्‍चित केल्या असून त्यानुसार कामकाज सुरू देखिल झाले आहे.
परंतू निर्णयांची अंमलबजावणी कशा पद्धतीने होणार याबाबत अस्पष्टताच होती.
मात्र, नगरसचिव शिवाजी दौंडकर यांनी कार्यालयीन परिपत्रक काढत कामकाज कसे होणार हे स्पष्ट केले आहे. Pune Municipal Corporation (PMC)

नगरसचिव कार्यालयामार्फत मुख्य सभा (PMC GB), स्थायी समिती व अन्य विशेष समित्यांच्या सभांचे आयोजन केले जाते.
कार्यपत्रिका व ठराव तयार केले जातात. सभांचे इतिवृत्तही तयार केले जाते.
प्रशासक नियुक्त केल्यानंतरही या समित्यांचे कामकाज महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसारच चालणार आहे.
याअंतर्गत कलम २ मधील नियम १ अन्वये सर्व साधारण सभा प्रत्येक महिन्याच्या २० तारखेच्या आतमध्ये तर नियम ३ (अ) अन्वये स्थायी समिती ही आठवड्यातून एकदा भरवावी लागणार आहे.
कलम ३० अन्यवे स्थापीत विधी समिती, शहर सुधारणा समिती, महिला व बालकल्याण समिती, क्रीडा समिती, शिक्षण समिती व नाव समिती यांच्या पाक्षिक सभा आयोजित करण्यात येतील.
सर्व समित्यांकडे प्रचलित कार्यपद्धतीनुसार विविध प्रस्ताव नगरसचिव कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येतील.
नगरसचिव कार्यालयामार्फत या प्रस्तावावर महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही होईल,
असे दौंडकर यांनी काढलेल्या परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे.

 

Web Title :- Pune Municipal Corporation (PMC) | Subject committees including the PMC GB
and standing committee of Pune Municipal Corporation will also function But

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा