Pune Municipal Corporation (PMC) | पुणे महानगरपालिका प्रशासकपदी आयुक्त विक्रम कुमार, अधिकाऱ्यांना दिले ‘हे’ आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Municipal Corporation (PMC) | पुणे महापालिकेची विद्यमान मुदत 14 मार्च 2022 रोजी संपुष्टात आली आहे. महापालिका निवडणुका (Pune Municipal Election) अद्याप घोषीत झालेल्या नाही. या पार्श्वभूमीवर महापालिकेचा कारभार पाहण्यासाठी प्रशासक (Administrator) नियुक्त करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या (Government of Maharashtra) नगर विकास विभागाने (Urban Development Department) घेतला आहे. पुणे महानगरपालिकेचे Pune Municipal Corporation (PMC) प्रशासक म्हणून आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

पुणे महापालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने नागरिकांना त्यांच्या नागरी सुविधांबाबत प्रश्न,
गाऱ्हाणी तसेच इतर तक्रारीकरिता अधिकारी उपलब्ध असणे आवश्यक आहे.
या पार्श्वभूमीवर महापालिका अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे (PMC Additional Commissioner Ravindra Binwade)
यांनी महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार अधिकाऱ्यांना आदेश जारी केले आहेत.

सर्व खाते प्रमुख, वरिष्ठ अधिकारी (Senior Officer), उपायुक्त (Deputy Commissioner)
परिमंडळ 1 ते 5 यांनी सोमवार ते गुरुवार सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत आपल्या कार्यालयात हजर राहून नागरिकांच्या तक्रारी,
गाऱ्हाणी ऐकून त्यांचे निवारण करावे.
तसेच सर्व महापालिका सहाय्यक आयुक्तांनी (Assistant Commissioner) दररोज सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत आपल्या कार्यालयात उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारी, गाऱ्हाणी ऐकून त्याचे निवारण करावे, असे आदेशात (Order) नमूद करण्यात आले आहे.

 

Web Title :- Pune Municipal Corporation (PMC) | Vikram Kumar Commissioner Pune Municipal Corporation gave this order to the all pmc officers

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा