Pune Municipal Corporation (PMC) | पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी विलास कानडे यांनी निवड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Municipal Corporation (PMC) | पुणे महापालिकेच्या मिळकतकर विभागाचे (Revenue Department) प्रमुख विलास कानडे (PMC Vilas Kanade) यांची राज्य शासनाने (Maharashtra State Government) अतिरिक्त आयुक्तपदी (PMC Additional Commissioner) निवड केली आहे. ज्ञानेश्वर मोळक (Dnyaneshwar Molak) यांच्या निवृत्तीनंतर रिक्त झालेल्या पदावर विलास कानडे यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली. पुणे महापालिकेमध्ये (Pune Municipal Corporation (PMC)  तीन अतिरिक्त आयुक्तांच्या जागा आहेत, त्यापैकी दोन ठिकाणी आयएएस (IAS) अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाते तर एका जागेवर महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाते.

 

पुणे महापालिका तसेच फक्त आणि फक्त पुण्यातील राजकारणाच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

विलास कानडे हे 37 वर्षांहून अधिक काळ महापालिका सेवेत आहेत. मितभाषी असलेल्या कानडे यांनी विविध विभागांमध्ये काम पाहिले आहे. राज्य सरकारने जकात रद्द करुन त्याऐवजी स्थानिक संस्था कर (LBT) लागू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यावेळी जकात विभाग प्रमुख म्हणून त्यांची महत्त्वाची भूमिका ठरली. व्यापाऱ्यांचा तिव्र विरोध असताना सतत संवाद व चर्चा करुन त्यांनी एलबीटीची यशस्वी अंमलबजावणी केली होती. महापालिकेचे (Pune Municipal Corporation (PMC) उत्पन्न वाढविण्यासाठी मिळकत कर विभागात त्यांनी विविध उपाययोजना राबविल्या आहेत. मागील वर्षी महापालिकेने अठराशे कोटी उत्पन्नाचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला आहे.

तसेच केंद्र सरकारने (Central Government) जीएसटी (GST) लागू करताना एलबीटी रद्द होणार असे सांगितले. त्याबदल्यात मागील पाच वर्षात सर्वोच्च उत्पन्न असलेली रक्कम आधार मानून त्यानुसार प्रत्येकवर्षी रक्कम देण्याचा निर्णय घेतला. एलबीटीमध्ये कानडे यांनी सर्वोच्च उत्पन्न मिळवून दिल्याने आता जीएसटीचा निधी मोठ्या प्रमाणात मिळत आहे.

 

अतिरिक्त आयुक्त पदावर नियुक्ती झाल्यावर विलास कानडे म्हणाले, ज्या ज्या विभागात काम केले त्याठिकाणी मी महापालिकेचा विचार केला.
जकात, एलबीटी आणि मिळकतकर या तिन्ही कर प्रणालीत काम करता आले.
आता अतिरिक्त आयुक्तपदाची जबाबदारी त्याच क्षमतेने पार पाडली जाईल.

 

Web Title :- Pune Municipal Corporation (PMC) | vilas kanade elected as additional commissioner of pune municipal corporation

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Weather Updates | आगामी 5 दिवस ‘या’ भागात अलर्ट; हवामानाची स्थिती काय? जाणून घ्या

 

Devendra Fadnavis on Aditya Thackeray | मी हिंदू, मागील जन्मावर आणि पुनर्जन्मावर विश्वास, 1857 च्या युद्धातही लढत असेन; देवेंद्र फडणवीस (व्हिडीओ)

 

BP Control Tips | उन्हाळ्यात ‘ब्लड प्रेशर’ वाढणे ठरू शकते धोकायदायक, ‘या’ 5 ड्रिंक्सने करा बीपी कंट्रोल