Pune News : अनधिकृत बांधकामावर पुणे महापालिकेची मोठी कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महानगरपालिका हद्दीमधील झोन क्र. 2 मधील आंबेगाव बु. व येवलेवाडी येथे पुणे महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात आली. या कारवाईत 21 हजार 800 चौ. फुट क्षेत्र मोकळे करण्यात आले. ही कारवाई झोन क्र. 2, आंबेगांव बु. स.नं. 9/1 येथील विना परवाना बांधकामावर महाराष्ट्र रिजनल ॲण्ड टाऊन प्लॅनिंग ॲक्ट अन्वये नोटीस देऊन कारवाई करण्यात आली.

या कारवाईमध्ये आंबेगांव बु. येथील गुरुनानी /टीयारा ग्रुप व इतर यांच्या 7500 चौ. फुट क्षेत्रावर कारवाई करून हे क्षेत्र मोकळे करण्यात आले. ही कारवाई 1 जॉ कटर, 2 ब्रेकर, 1 जेसीबी, 1 गॅस कटर, बिगारी सेवक व पोलिसांच्या सहाय्याने पूर्ण करण्यात आली.

येवलेवाडी येथे करण्यात आलेल्या कारवाईमध्ये सेक्टर नंबर 1 मधील राजे उमाजी नाईक चौक येथील हामजा इनामदार व इतर यांचे 1200 चौ. फुट, से.नं. 30 व 31 पानसरे नगर येथील अंकुश बनसोडे व इतर यांचे 300 चौ. फुट, अल्लाउद्दीन शेख व इतर यांचे 1200 चौ. फुट, बाब डेव्ह. तर्फे जंमी सैफी यांचे 5600 चौ. फुट, बाब डेव्हलप्मेंट तर्फे राजेंद्र भिंताडे व जहागिरदार डेव्हलपमेंट तर्फे अमित तुपे व हनिफ खान व सय्यद यांचे 6000 चौ. फुट असे एकूण 14300 चौ. फुटाचे क्षेत्र मोकळे करण्यात आले. ही कारवाई 1 ब्रेकर, 2 जेसीबी, 1 गॅस कटर, बिगारी सेवक व पोलिसांच्या सहाय्याने पूर्ण करण्यात आली.