Pune : स्वारगेट ट्रान्स्पोर्ट हबमध्ये पालिकेने मागितला 50 % हिस्सा : बागुल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महामेट्रोच्या नियोजित स्वारगेट ट्रान्स्पोर्ट हबमध्ये उत्पन्नातील ५० टक्के हिस्सा महापालिकेला मिळावा अशी मागणी आयुक्तांच्या मान्यतेने करण्यात आली असल्याची माहिती कॉंग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांनी दिली.

सार्वजनिक हिताकरिता पुणे मेट्रो प्रकल्पासाठी महापालिकेने महामेट्रोकडे जागा हस्तांतरित केल्या आहेत. मेट्रोचे मुख्य अभियंता यांच्या अभिप्रायानुसार मेट्रोने व्यावसायिक वापर केल्यास त्यातील ५० टक्के वाटा पालिकेला द्यायला हवा. स्वारगेट येथील मल्टी मॉडेल ट्रान्स्पोर्ट हब हे व्यापारी संकुल असणार आहे, त्यामुळे उत्पन्नातील ५० टक्के हिस्सा महामेट्रोकडे मागावा असे आबा बागुल यांनी आयुक्तांना जुलै महिन्यात सुचविले होते. आयुक्तांच्या मान्यतेने महामेट्रोला ट्रान्स्पोर्ट हब मध्ये ५० टक्के हिस्सेदारीची मागणी केली आहे. या संदर्भात पालिका उपायुक्त राजेंद्र मुठे यांनी दि. २३ रोजी महामेट्रोला पत्र पाठविले आहे. या हिस्सेदारीमुळे पालिकेला भरीव उत्पन्न मिळेल, असे बागुल यांनी सांगितले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like