Pune Municipal Corporation | महापालिका शिक्षण मंडळाच्या आकृतीबंधास राज्य शासनाची मान्यता ! शिक्षक व शिक्षकेत्तर संवर्गातील पदोन्नती व सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा

पुणे – पुणे महापालिकेच्या (pune municipal corporation) कार्यक्षेत्राची वाढती व्याप्ती लक्षात घेउन राज्य शासनाने पुणे महापालिका (pune municipal corporation) शिक्षण मंडळाच्या आकृतीबंधाला तसेच वाढीव पदनिर्मितीस आज मान्यता दिली. यामुळे शिक्षण मंडळाकडील गेली अनेकवर्षे रखडलेला शिक्षक व शिक्षकेतर पदावरील कर्मचार्‍यांच्या (teachers and non-teaching cadres) पदोन्नतीचा (Promotion) प्रश्‍न निकाली निघणार असून रोजंदारीवर काम करणार्‍या कर्मचार्‍यांनाही न्याय मिळणार आहे.

पुणे महापालिकेची (pune municipal corporation) हद्द वाढ होत असताना महापालिकेने २०१४ मध्ये महापालिका प्रशासनाचा आकृतीबंध मान्यतेसाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडेे पाठविला होता. तर त्यावेळी शिक्षण मंडळ ही स्वायत्त संस्था असल्याने त्यांचा आकृतीबंध शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडे पाठविण्यात आला होता. नगरविकास विभागाने महापालिका प्रशासनाचा आकृतीबंध यापुर्वीच मंजूर केला आहे. परंतू राज्य शासनाच्या आदेशानुसार २०१८ मध्ये शिक्षण मंडळ बरखास्त करण्यात येउन सर्व कारभार महापालिकेकडे सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला. शिक्षण मंडळाचा कारभार महापालिकेकडे आल्याने शिक्षण मंडळाच्या आकृतीबंधासंदर्भातील शासन स्तरावरील सर्व कारभार नगरविकास विभागाकडे आला. यामुळे शिक्षण मंडळाचा आकृतीबंध रेंगाळला होता. यामुळे शिक्षक व शिक्षकेतर पदावरील पदोन्नती, वेतनश्रेणी आदी बाबी प्रलंबित राहील्या होत्या. तसेच शिक्षण मंडळाकडे वर्षानुवर्षे रोजंदारीवर काम करणार्‍यांच्या सेवेत कायम होण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या.

राज्यात दीड वर्षापुर्वी सत्तांत्तर झाल्यानंतर या आकृतीबंधाला मान्यता मिळावी यासाठी पुन्हा प्रयत्न
सुरू झाले होते. विशेषत: शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष प्रदीप उर्फ बाबा धुमाळ यांनी उपमुख्यमंत्री
तथा पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्षण मंडळाचा आकृतीबंध मान्य केला. शासन आदेशानुसार शिक्षकेतर संवर्गातील ९८९ पदांना तसेच संचता मान्यता नसलेल्या शिक्षक संवर्ग व इतर संवर्गाच्या १ हजार १०४ पदांच्या आकृतीबंधास मान्यता दिली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे शिक्षण मंडळाकडील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

हे देखील वाचा

Bank new rules | ‘या’ 5 सरकारी बँकांचे आहात ग्राहक, तर ‘ही’ 2 कामे करणे आहे आवश्यक; जाणून घ्या कारण

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Municipal Corporation | State Government approves the structure of Municipal Education Board! permanent the way for promotion and perpetuation in the service of teachers and non-teaching cadres

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update