Pune Municipal Election | पुण्यात असणार ‘एवढे’ नगरसेवक आणि प्रभाग, कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महानगरपालिकेची निवडणूक (Pune Municipal Election) तीन सदस्य प्रभाग या पद्धतीने होणार आहे. प्रभाग रचनेचा कच्चा प्रारुप आराखडा तयार (ward prepare raw plan) करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाकडून (State Election Commission) महापालिकेला मिळाले आहे. त्यानुसार पुणे महापालिकेच्या निवडणुकीत (Pune Municipal Election) एकूण लोकसंख्येनुसार नगरसेवकांची संख्या 166 इतकी असणार आहे. शहरात तीन सदस्यांचे 54 तर चार सदस्यांचा एक असे एकूण 55 प्रभाग रचना करण्याचे आदेश आयोगाकडून देण्यात आले आहेत.

पुणे महानगरपालिकेची निवडणूक (Pune Municipal Election) फेब्रुवारी-मार्च 2022 मध्ये होणार आहे. राज्य सरकारने (State Government) यापूर्वी ही निवडणूक एक सदस्य प्रभाग पद्धतीने होणार असल्याचा निर्णय घेतला. परंतु, आता हा निर्णय बदलून तीन सदस्यांचा एक प्रभाग करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यपालांनी 30 सप्टेंबर रोजी या निर्णयावर स्वाक्षरी करुन मोहोर उमटवली त्यानंतर निवडणूक आयोगाने मंगळवारी प्रभाग रचनेसाठी महापालिकांना आदेश दिले. आयोगाच्या आदेशानुसार बुधवार (दि.6) पासून प्रभाग रचनेच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे.

 

कशी होणार प्रभाग रचना

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महापालिकेची (Pune Corporation) 2011 ची एकूण लोकसंख्या 35 लाख 56 हजार 824 इतकी दाखवण्यात आली आहे. त्यानुसार नगरसेवकांची संख्या 166 इतकी असणार आहे. यामध्ये 3 सदस्यांचे 54 प्रभाग आणि शेवटचा एक प्रभाग 4 सदस्यांचा तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुणे महापालिकेत 23 गावांचा समावेश करण्यात आला असला तरी केवळ चार नगरसेवकांची संख्या वाढल्याचे यावरून स्पष्ट होते.

 

स्पष्टीकरण देण्याची जबाबदारी समितीची

निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेचा आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत. प्रभाग रचना करताना राजकीय दबावाला बळी पडून चुकीच्या पद्धतीने आराखडा तयार केला जातो. यापूर्वी असे प्रकार घडले असून न्यायालयात याचिता दाखल झाल्या आहेत. यामुळे कच्चा आरखडा तयार केल्यानंतर हा आरखडा कसा तयार केला ? का केला ? कोणत्या निकषांचे पालन केले तसेच नियमांचे उल्लंघन का केले ? यासंदर्भात निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण देण्याची जबाबदारी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीची असणार आहे, असे आयोगाने आदेशात नमूद केले आहे.

Web Title :- Pune Municipal Election | Pune will have ‘so many’ corporators and wards, orders to prepare a rough plan

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pension News | 3 लाखपेक्षा जास्त पेन्शनरला सरकारकडून मोठी भेट, ‘या’ तारखेपासून वाढवली रक्कम

PMC Employees | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार ‘गोड’ ! मिळणार 8.33 % दिवाळी बोनस आणि ‘एवढया’ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान

Indian Railways | खूशखबर ! मोदी सरकारकडून रेल्वे कर्मचाऱ्यांना ‘गिफ्ट’; तब्बल ‘एवढ्या’ दिवसांचा दिवाळी बोनस मिळणार