Pune : पालिकेच्या वॉर्ड अधिकार्‍यांचे दुर्लक्ष, कोंढव्यात 10 दिवस रस्त्यावरुन वाहत होते सांडपाणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोंढव्यातील सर्वात वर्दळीचा रस्ता असलेल्या अशोका मुव्युज सोसायटीच्या समोरील मुख्या रस्त्यावर सलग १० दिवस मैलायुक्त पाणी वाहत असताना कोंढवा वॉर्ड अधिकार्‍यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. पुण्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन दिवस रात्र प्रयत्न करत आहेत . शेवटी नागरिकांनी नगरसेवकांकडे केलेल्या पाठपुराव्यानंतर हे काम पूर्ण करण्यात आले आहे. ड्रेनेज पाईप लाईनीवर बालाजी ट्रेडिंग कंपनी यांनी बेकायदा बांधकाम करण्यात आल्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.

कोंढवा मुख्या वर्दळीच्या रोडवरील अशोका मुव्युज या सोसायटीच्या समोरील सांडपाणी वाहिनी तुबल्याने गेल्या १० दिवसापासून रोडवरुन पाणी वाहत होते.येणाऱ्या जाणारे वाहतुकी मुळे सांडपाणी नागरिकांच्या अंगावर उडत होता. महापालिकेचे कर्मचारी येऊन पाहणी करून गेले. येथील ड्रेनेज तुंबून पाणी रोडवर येत होते.

पोलीसनामा चे प्रतिनिधींनी रस्त्यावरुन वाहून जाणारे सांडपाणी व ड्रेनेज लाईनचे फोटो काढून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका परवीन हाजी फिरोज यांना व्हाटसअप केले. त्यावर हाजी फिरोज यांनी रस्त्यावरचे ड्रेनेज लाईन महापालिका किंवा वार्ड ऑफिसचे काम आहे. रस्ता प्रभागात येत नाही. त्यांनी सफाई कामगार बोलावून ड्रेनेज लाईन साफ करुन घेतली. तरी दुसर्‍या दिवशी ते ड्रेनेज पुन्हा तुंबले.

तसेच ते फोटो नगरसेवक गफूर पठाण व माजी नगरसेवक रईस सुंडके यांना व्हाट्सआप केले. गफूर पठाण यांनी त्यांचे सफाई कामगार राजू व किशोर व माजी नगरसेवक राईस सुंडके यांच्या सांगण्यावरुन सफाई कामगार घोलप यांनी ड्रेनेज साफ केले. तरीही ते दुरुस्त झाले नाही. त्यावर माजी नगरसेवक रईस सुंडेक व अपना कोंढवा चे सामाजिक कार्यकर्ते जफर खान यांनी सांगितले की, ड्रेनेज लाईन कितीही साफ केली तरी हा प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी स्वतंत्र नवीन पाईप लाईन टाकावी लागेल.त्यावरही वॉर्ड अधिकारी जागे झाले नाही.

दरम्यान दुसर्‍या दिवशी हाजी फिरोज यांनी अशोका मुव्युज सोसायटीच्या सेक्रेटरी, पोलीसनामाचे प्रतिनिधी बसित शेख, झाकीर शेख, समीर शेख, अमजद शेख, शानवाझ शेख यांच्यासह कर्मचार्‍यांनी रस्त्यावरील ड्रेनेज लाईनची तपासणी केली. तेव्हा असे दिसून आले की रस्ता कॉक्रिटीकरण करताना ड्रेनेज लाईनचे झाकण तीन फुट आत जमिनीत गेल्यामुळे ड्रेनेज लाईन तुंबत होती.

हाजी फिरोज यांनी तातडीने ८ ते १० कामगार लावून जेसीबीच्या सहाय्याने पूर्ण रस्ता खोदून नवीन पाईपलाईन टाकून नवीन ड्रेनेज लाईन बनवून हा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लावला. आपण प्रभागात नागरिकांची कामे करुन दाखवितो, भांगा लावून फिरत नसल्याचे सांगितले.