Pune : दत्तवाडी परिसरात किरकोळ कारणावरून एकावर खुनी हल्ला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – किरकोळ कारणावरुन एकावर सपासप वारकरून खुनाचा प्रयत्न केल्याची घटना दत्तवाडी भागात घडली. तरुणाचा हात आणि पाय फॅक्चर्स झाला आहे. तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी निलेश जोगदंड (वय 32, रा. दांडेकर पूल) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घरासमोर आईसोबत बोलत उभारले होते. त्यावेळी अचानक शेजारच्या इमारतीत राहणारा तरुण आला. त्याने फिर्यादीस माझ्याकडे काय बगतो रे असे म्हणून वाद घातला. त्यानंतर रागाच्या भरात इतर दोन मित्रांना बोलवून घेत तिघांनी मिळून फिर्यादी यांना लोखंडी पाईपने बेदम मारहाण करत त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यानंतर आरोपी पसार झाले. माहिती मिळताच दत्तवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिक तपास दत्तवाडी पोलीस करत आहेत.