Pune : मृतावस्थेत सापडलेल्या ‘त्या’ अनोळखी तरुणाचा खून, तपासात माहिती समोर

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – चतुशृंगी भागात एका सोसायटीच्या मागे मृतावस्थेत सापडलेल्या त्या तरुणाचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्या गळ्यावर, पोटावर वार करुन खून केल्याचे उघड झाले आहे. ससून रुग्णालयाने याबाबतचा अहवाल दिला आहे. त्यानुसार खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. सहा दिवसांपुर्वी उघडकीस आली होती.

याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील सुतारवाडी परिसरात असलेल्या शिवनगर सोसायटीमागे एका ३० ते ३५ वयोगटातील तरुणाचा मृतदेह पोलिसांना आढळून आला होता. त्याची ओळख अद्याप पटलेले नाही. दरम्यान मृतदेह ससून रूग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविला होता. त्यानुसार या तरुणाच्या गळ्यावर, पोटावर व बोटावर शस्त्राने वार झाल्याचे ससून अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक माया देवरे अधिक तपास करीत आहेत.