Pune Murder Case | वडगाव बुद्रुक परिसरात मैत्रिणीबरोबर गप्पा मारत बसलेल्या मुलाचा खून करणारे अटकेत

पुणे : Pune Murder Case | मैत्रिणीबरोबर गप्पा मारत बसलेल्या अल्पवयीन मुलाच्या डोक्यात बिअरची बाटली व झाडाची कुंडी घालून रविवारी खून (Murder In Pune) करण्यात आला होता. या खून प्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी (Sinhagad Road Police) आरोपीला ८ तासाच्या आत जेरबंद केले. (Pune Murder Case)

स्वप्निल अंकुश उभे Swapnil Ankush Ubhe (वय २२, रा. माऊली आंगन अपार्टमेंट, सदाशिव दांगटनगर, वडगाव) असे खून करणार्‍याचे नाव आहे. नागेश ऊर्फ सिल्व्हर सानवान्ना चिंचोळे (Nagesh alias Silver Sanwanna Chinchole) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. नागेश चिंचोळे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील विधीसंघर्षित बालक आहे. दीड वर्षापूर्वी स्वप्निल उभे आणि नागेश चिंचोळे यांच्यात वाद झाला होता. वडगाव बुद्रुक (Vadgaon Budruk, Pune) येथील घुलेनगर परिसरातील मोकळ्या जागेमध्ये नागेश हा मैत्रिणीसोबत गप्पा मारत बसला होता. त्यावेळी स्वप्निल उभे हा तेथून जात होता. त्याने नागेश याला तेथे बसलेले पाहिले. त्याने पाठीमागून येऊन नागेशच्या डोक्यात प्रथम बियरची बाटली मारली. तसेच त्याच्या कॉलरला धरुन फरफटत नेऊन जवळच असलेल्या कचराकुंडीजवळील दगडावर त्याचे डोके दोन तीन वेळा आपटले. त्यानंतर कुंडी डोक्यात घातली. तेथे पडलेल्या लाकडी दांडक्याने त्याच्या डोक्यात ४ ते ५ फटके मारले. त्यात नागेश याचा जागीच मृत्यु झाला. (Pune Murder Case)

या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे अधिकारी व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहचले.
आरोपीचा शोध घेत असताना पोलीस कर्मचारी राहुल ओलेकर, शिवाजी क्षीरसागर व अविनाश कोंडे यांना
माहिती मिळाली की, स्वप्निल उभे हा जनता वसाहतीत लपून बसला आहे.
पोलिसांनी वाघजाई टेकडीवर जाऊन त्याचा शोध सुरु केला. पोलिसांना पाहून तो पळून जाऊ लागला.
तेव्हा पोलिसांनी पाठलाग करुन उभे याला पकडले.

स्वप्निल उभे याला न्यायालयात हजर केले असताना न्यायालयाने अधिक तपासासाठी ७ दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody) मंजूर करण्यात आली आहे.

Web Title :- Pune Murder Case | Sinhagad road police arrested the murderer of a minor in 8 hours

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Encroachment On Hills In Pune | येवलेवाडी परिसरात ‘डोंगरफोड’ करून ‘ओढे बुजवून’ वेगाने विकास कोट्यवधी रुपये खर्चून केलेले रस्ते कायमच ‘खड्डयात’; बांधकाम व्यावसायाला चालना देण्यासच अनियोजीत रस्त्यांच्या ‘घाट’

Pune Crime | धक्कादायक! पुण्यात सहा दिवसाच्या लेकीची निर्दयी बापाने केली तृतीयपंथीयांना विक्री

Popular Front of India (PFI) | PFI वर दुसरी मोठी कारवाई ! 7 राज्यांत 200 ठिकाणांवर छापे; 170 जण ताब्यात, पुण्याच्या कोंढाव्यातून 6 जणांची धरपकड