Pune : पुण्यात 500 रुपयांसाठी खून करणाऱ्याला जन्मठेप; जाणून घ्या खटला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   हातउसने घेतलेले ५०० रुपये(Rs.500) परत देण्यावरून झालेल्या वादातून तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून(Murder) करणाऱ्याला जन्मठेप आणि ५०० रुपये(Rs.500) दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एन. सोनवणे यांनी हा आदेश दिला. तानाजी बाबूराव पांढरे (वय ४५, रा. सोलापूर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. त्याने बसवराज (वय ३५) यांचा खून केला आहे. १३ जुलै २०१८ रोजी शिवाजीनगर रेल्वे स्टेशन पंप हाऊससमोर हा खून झाला होता. याबाबत सचिन हनुमंत अलगुडे (वय २८) यांनी फिर्याद दिली आहे.

मोदी सरकारची मोठी घोषणा ! 12 कोटी विद्यार्थ्यांच्या खात्यात ‘ट्रान्सफर’ होणार पैसे, जाणून घ्या कुणाला मिळणार ‘लाभ’

या खटल्याचे कामकाज सरकारी पक्षातर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. रमेश घोरपडे यांनी पाहिले. त्यांनी दहा साक्षीदार तपासले. सहायक पोलीस निरीक्षक अमर कदम यांनी या प्रकरणाचा तपास केला. सहायक पोलीस उपनिरीक्षक विष्णू साळेकर, पोलीस नाईक दत्तात्रय मोरे, पोलीस नाईक निशांत कसबे यांनी न्यायालयीन कामकाजासाठी मदत केली. मयत आणि आरोपी दोघेही फिर्यादीच्या वडापावच्या गाड्यावर कामावर होते. आरोपीने मयतकडून ५०० रुपये उसने घेतले होते. हे पैसे मयत वारंवार परत मागत होता. या कारणावरून चिडून आरोपीने मयतचा खून केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यावर युक्तिवाद करताना अधिकाधिक शिक्षा देण्याची मागणी अ‍ॅड. रमेश घोरपडे यांनी केली.

त्यावर निकाल देत न्यायालयाने खुनाच्या कलमानुसार शिक्षा सुनावली.

High Cholesterol Warning Signs : हात, डोळे आणि त्वचेवर दिसतात हाय कोलेस्ट्रॉलची ‘ही’ 3 लक्षणं, जाणून घ्या

पेट्रोल, डिझेलच्या दरात महिन्यातील 15 व्या वेळेस वाढ !

Black fungus : कोरोनाच्या उपचारात महागात पडत आहे ‘ही’ चूक, ब्लॅक फंगसचे ठरत आहे कारण, जाणून घ्या

कामाची गोष्ट ! देशातील कोणत्याही कोपर्‍यात बसून दिल्ली AIIMS च्या डॉक्टरांचा घ्या सल्ला, जाणून घ्या हेल्पलाईन नंबर

Coronavirus : व्हॅक्सीन घेणार्‍यांमध्ये कोरोना होईल आणखी धोकादायक? भारतीय शास्त्रज्ञांनी सांगितले ‘सत्य’; जाणून घ्या