Pune : चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खुन ! पतीची गळफास घेऊन आत्महत्या, पुण्यातील खळबळजनक घटना

पुणे : चारित्र्याच्या संशयचावरुन पत्नीचा गळा दाबून खुन (Murder) करुन नंतर पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार वडगाव शेरी येथे घडला. उषा योगेश गायकवाड (वय २८) असे खुन (Murder) झालेल्या महिलेचे नाव आहे. योगेश तानाजी गायकवाड (वय ३३, रा. पिराजीनगर, माळवाडी, वडगाव शेरी) असे गळफास घेतलेल्या पतीचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश गायकवाड हा पत्नी व १० वर्षाच्या मुलीसह पिराजीनगर येथे एका पत्र्याच्या खोलीत रहात होता. योगेश गायकवाड हा लॉकडाऊन सुरु झाल्यापासून काही कामधंदा करीत नव्हता. उषा ही स्वयंपाकाची व धुणेभांडी करुन संसार चालवत होती. गेल्या काही दिवसांपासून योगेश हा उषा हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता.

सोमवारी रात्री साडेदहा वाजता ते तिघेही जण टीव्ही पहात होते. त्यावेळी योगेश याने मुलीला तु जाऊन झोप असे सांगितले.  त्यानुसार मुलगी शेजारच्या खोलीत जाऊन झोपली. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास योगेश याने उषा हिचा गळा दाबून तिचा खुन केला. त्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी ६ वाजता मुलगी उठली व तिने दरवाजा उघडल्यावर तिने वडिलांनी गळफास घेतल्याचे दिसले. या मुलीने हा प्रकार आपल्या नातेवाईकांना कळविला. ते घरी आले. त्यानंतर त्यांनी ही बाब पोलीस नियंत्रण कक्षाला कळविली. उषा गायकवाड हिच्या शवविच्छेदनात गळा दाबल्याने मृत्यु झाल्याचा अहवाल ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी दिला. त्यानुसार चंदननगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

Also Read This : 

 

कोविड-19 ची व्हॅक्सीन तुम्हाला किती काळापर्यंत सुरक्षित ठेवू शकते?, जाणून घ्या

 

जाणून घ्या, काळी द्राक्षं खाण्याचे फायदे

 

बदलला BSNL चा हा प्लॅन, आजपासून रोज मिळेल 1GB च्या ऐवजी 2GB डेटा

 

अमृताप्रमाणे काम करते गुळ आणि गरम दूधाची जोडी, ‘हे’ 7 फायदे जाणून घेणे आवश्यक

 

Property Tax : पुणेकरांना महापालिकेकडून मोठा दिलासा ! मिळकत कर योजनेची मुदत ‘या’ तारखेपर्यंत वाढवली; आतापर्यंत 736 कोटींचे विक्रमी उत्पन्न

 

जाणून घ्या, केसांसाठी ऑलिव्ह ऑईलचे फायदे