पुण्यातील हडपसर भागात किरकोळ वादातून तरुणाचा खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील हडपसर भागात दुसऱ्या गटातील मुलांसोबत का फिरतो या कारणावरून तरुणाचा खून करण्यात आला. तरुणाला बेदम मारहाण केली होती, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

प्रवीण रमेश नाईकनवरे (वय 24 , रा. फुरसुंगी) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी प्रसाद राऊत (वय 23) याने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत व आरोपी एकमेकांच्या ओळखीतले आहेत. दरम्यान यातील एका आरोपीचे काही दिवसांपूर्वी मयत याच्या मित्रासोबत वाद झाले होते. त्याला मारहाण केली होती.
दरम्यान प्रवीण हा त्याच्यासोबत फिरत होता. याचा राग आरोपींच्या मनात होता.

दरम्यान आज सकाळी फिर्यादी आणि प्रवीण हे येथे निघाले दुचाकीवरून जात होते. त्यावेळी चौघे जण आले. त्यांनी फिर्यादी यांची दुचाकी अडविली. तसेच त्याच्यासोबत का फिरता असे म्हणून दोघांना बेदम मारहाण केली. यात प्रवीण हा गंभीर जखमी झाला होता. या दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र सायंकाळी प्रवीण याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

दरम्यान याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात खुनाचे कलम वाढविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. अधिक तपास हडपसर पोलीस करत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like