पुण्यातील कोंढव्यात युवकाचा भर रस्त्यात सपासप वार करून खून, दोघे ताब्यात

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – शहरात सुरू झालेले खुनाचे सत्र थांबत नसून, पुन्हा पूर्ववैमनस्यातून कोंढाव्यात एकाचा भर रस्त्यात सपासप वारकरून खून करण्यात आल्याची घटना सोमवारी रात्री घडली आहे. पोलिसांनी दोघांना पकडले आहे.

बबलू इब्राहिम सय्यद (वय 27) असे खून झालेल्याचे नाव आहे. तर याप्रकरणी सैफ फरीद सय्यद आणि
तौसीफ फरीद सय्यद या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर साथीदार पसार झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बबलू हा पूर्वी पेठेत राहत होता. काही वर्षांपूर्वी तो कोंढाव्यात राहण्यास आला होता. दरम्यान आरोपीच्या भावावर बबलू याने 5 वर्षांपूर्वी प्राणघातक हल्ला केला होता. याप्रकरणी त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा देखील दाखल आहे. याचा राग आरोपींच्या मनात होता.

दरम्यान येथील मिठानगर भागातून बबलू दुचाकीवर सोमवारी सायंकाळी जात असताना आरोपींनी त्याला अडविले. तसेच त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. भररस्त्यात झालेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. आरोपी पसार झाल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात बबलू भररस्त्यात पडून होता. पण काही वेळ त्याच्या मदतीला कोणी आले नाही. त्याचे शूटिंग मोबाईलमध्ये काढण्यात आले. पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. तसेच बबलू याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण, त्याचा काही तासांनी मृत्यू झाला. त्यानुसार पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like