पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये मध्यरात्री एकाचा खून, दोघे ताब्यात

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पुण्यातील उच्चभ्रू परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीत सराईत गुन्हेगाराची फरशी डोक्यात घालून निर्घृण खून करण्यात आला आहे. मध्यरात्री घडलेल्या या गुन्ह्यात मात्र पोलीस ठाण्यात अद्याप तरी काही माहिती आली नसल्याचे सांगितले जाते.

निलेश उर्फ गोट्या विठ्ठल शेडगे (वय 22, दरोडे वस्ती) असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निलेश उर्फ गोट्या हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. भोसरी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल असून या गुन्हयातुन तो पंधरा दिवसांपूर्वी कारागृहातुन बाहेर आला आहे. तो जामिनावर सुटला होता.

दरम्यान निलेशला दारूचे व्यसन आहे. तो राहण्यासाठी दरोडेवस्तीत आहे. दरम्यान रात्री बारा वाजण्याच्या सुमारास त्याचे आणि काही वस्तीमधील मुलांचे वाद झाले होते. त्यातून 3 ते 4 जणांनी त्याला मारहाण करून तसेच डोक्यात फरशी घालून त्याचा खून केला.

ही माहिती मिळाल्यानंतर कोरेगाव पार्क पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान आरोपी पसार झाले आहेत. यातील दोघांना पहाटे पकडले आहे. त्यांच्याकडे चौकशी सुरू असून खुनामागचे कारण शोधण्यात येत आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/