Lockdown : पुण्यात दुचाकीचे पेट्रोल चोरी करताना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – वारजे येथील डुक्कर खिंड येथे दुचाकीतून पेट्रोल चोरी करणाऱ्या व्यक्तीचा मारहाणीत जागीच मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी ही घटना घडली आहे. अद्याप मारेकऱ्याची माहिती मिळू शकली नाही.

प्रशांत ढाकणे (वय ४० ,रा. डुक्कर खिंड वारजे, मुळ बीड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत अज्ञात व्यक्तीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ढाकणे हा पानटपरीवर काम करत होता. शेजारी असलेल्या एका वाॅशिंग सेंटरवर एका व्यक्तीने त्याची दुचाकी सोडली होती. त्यावेळी ढाकणे हा दुचाकीतून पेट्रोल चोरी करत होता. त्यावेळी दुचाकी चालक कारमधून साथीदारांसोबत आला. पेट्रोल चोरी करताना ढाकणेला त्यांनी पाहीले असता, बेदम मारहाण केली. त्यामध्ये ढाकणेचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळाताच वारजे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक कदम, गुन्हे निरीक्षक अमृत मराठे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविला आहे. अधिक तपास वारजे माळवाडी पोलीस करत आहेत.