पुण्यातील कोंढव्यात ‘बंटी’चा सपासप वार करून खून, परिसरात खळबळ

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – कोंढवा भागात तरुणाचा सपासप वारकरून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. खूनाचे कारण अस्पष्ट असून पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

बंटी गायकवाड (वय 27) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी येवलेवाडी परिसरात रक्ताच्या थारोळ्यात एक व्यक्ती पडल्याचे आढळून आले. ही माहिती नागरिकांनी पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दिली. त्यांनतर कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. माहिती घेतली असता बंटी गायकवाड असे खून झालेल्या तरुणाचे नाव असल्याचे समोर आले आहे.

पूर्ववैमनस्यातून खून झाला असण्याची शक्यता आहे. मात्र आरोपी अज्ञात असून त्यांचा काहीच थांगपत्ता लागलेला नाही. पोलिसांकडून खुनाचे कारण आणि आरोपींचा शोध घेतला जात आहे. घटनास्थळी वरिष्ठ अधिकारी व कोंढवा पोलिसांनी भेट दिली आहे.